थंडी माघाची

पाषाणभेद जे न देखे रवी...
थंडी माघाची थंडी पडलीया माघाची राया माघाची घाई करा तुमी येण्याची ||धृ|| लवकर या हो जवळ घ्या हो जरातरी फिकीर करा वेळेची || नका नका आसं करू नका जिव माझा फुका जाळू नका एकटेच का दुर र्‍हाता तिथं पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची || थंडीनं जिव केला येडापिसा उन उन उबेला जवळी बसा हातावर हात आन पायावर पाय पहा चोळून राहिलेय मी केव्हाची || कालचा दिस आठवा ना रुसवा गोडीनं मिटवा ना आणलय काय दावून जरा मुठ उघडा हाताची || - पाभे
वर्गीकरण
काव्यरस

8 टिप्पण्या 2,161 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

प्रचेतस नवीन

आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी हो पेटवा..

अत्रुप्त आत्मा नवीन

@-एकटेच का दुर र्‍हाता तिथं पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची || .... पा.भे. त्वाडा जव्वाब नही....! ही म्हणजे कडक थंडित मारलेली-बेधडक सिक्सर आहे...! फाट-फुट-फट्याक येकदम...!

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

शाहीर पाभेंचा जाहीर सत्कार करावा काय? काय लिवलयं काय लिवलयं.. लय भारी राव!!

गणेशा नवीन

एकटेच का दुर र्‍हाता तिथं पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची || थंडीनं जिव केला येडापिसा उन उन उबेला जवळी बसा हातावर हात आन पायावर पाय पहा चोळून राहिलेय मी केव्हाची ||
लाजवाब

दिपक नवीन

झकास पाभे. येऊद्या अजुन थंडी जायच्या आत :-)