Skip to main content

" हे माझे पंढरपूर ! "

लेखक विदेश यांनी शनिवार, 30/06/2012 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
हात जोडतो देवापुढती, कधी न जातो दूर, घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर | वारकरी ना दिंडीमधला, मनास ना हुरहूर नातीगोती वारकरी, हे माझे पंढरपूर | सुखात सोबत विठ्ठल माझा, दु:ख बने कापूर सुविचारांचा टाळगजर, हे माझे पंढरपूर | कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर | घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1132
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर --- वाह अमृत