मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीट!

चैतन्य दीक्षित · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तनुवेलीवर यौवन फुलले, पाहुनिया तुज हे जग भुलले, हरले! सगळे प्रयत्न हरले ! सांभाळावे कसे मनाला? सांग तूच गे मला, शिकावी कुठे कलंदर कला ? नुकती सरली वर्षे सोळा ज्वानीचा ह्या नूर निराळा... भाव कसा मग असेल भोळा? नजरेच्या एका घावातच जीव जाहला खुळा ॥ सावळकांती, आखिव बांधा, चालीमधला झोक न साधा, मदनालाही होइल बाधा तुला पाहता, श्वास आतला आतच गं थांबला ॥ पदराआडुन हसते काही, बघणार्‍या मग भानच नाही, तुझाच तो होउनिया राही संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥ मनी तुझ्या जे काही दडले, ओठ सांगताना अवघडले, ते न इथे कोणाला कळले. ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥ - चैतन्य दीक्षित

वाचने 2026 वाचनखूण प्रतिक्रिया 9

चैतन्य दीक्षित 22/06/2012 - 15:35
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. ही कविता इथे द्यायला कारणीभूत ठरलेल्या (त्यांच्या 'काय/कोण सेक्सी वाटते' या धाग्यामुळे) 'शुचि'तैंचेही आभार :) मला माझी ही कविता सेक्सी वाटते :)

स्पंदना 22/06/2012 - 17:16
कवितेच नावच इतक आवडल ना, काय सांगु. अन कविता वाचुन तर जीव वेडा खुळा झाला. अगदी लटपट लटपट्...सारख काहीतरी झकास वाटुन गेल.

अमितसांगली 23/06/2012 - 08:45
संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ....कविता कधी संपूच नये असे वाटत होते....