मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आता तू येशील....

अज्ञात · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आता तू येशील...हळूच गालात हसशील उगाच "फुरंगटून" मग शेजारी बसशील लडिवाळ रागवताना पाठमोरी बसशील हळूच चाफा माळताना अलगद लाजशील बराच वेळ शब्दांविना खूप काही बोलशील जमिनीकडे पाहता पाहता एकटीच हसशील गार वारा तुझ्या कुंतलाशी झुलेल उडणार्‍या बटांमध्ये जीव माझा भूलेल हातात हात गुंफताना नशीब जुळवू पाहशील गुंतलेल्या रेषात मग आयुष्य शोधशील बोलके तुझे डोळे जेव्हा माझ्या डोळा भिडतील चटकन लहानाची... मोठी मग होशील वास्तवाची जाण होता हात अलगद सोडवशील मग चेहरा लपवता लपवता डोळे ओलावशील बराच वेळ शांत बसून हळूच हसशील लाजर्‍या डोळ्यांनी मग निरोप माझा घेशील पाठमोरी सुद्धा मग किती छान दिसशील हाय... जाता जाताही काळजालाही चटका देशील...

वाचन 3070 प्रतिक्रिया 0