Skip to main content

द्वंद्व

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 06/10/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
जिव्हाळा आसक्ती द्वंद मनामधे मन झाले मिंधे हतबल कुढत बसणे त्यांचा न स्वभाव उरातला घाव साहतो मी कळे ना मजसी ऐसे कैसे झाले प्रश्नांची वादळे घोंगावती मीही ठरविले नाही रडणार सांडती अपार अश्रू परी सुटता सुटता सुटेना हे कोडे झालो आम्ही वेडे जनांसाठी बुडवली गाथा पुन्हा इंदायणी वाचुनीया कोणी संत झाला....???
लेखनविषय:

वाचने 1298
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया