Skip to main content

जंगलातले चालणे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 07/10/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
(c) pashanbhed
जंगलातले चालणे
दुर रानात रानात शीळ घुमली कानात पाखरांची किलबील पानात पानात उभा बाजूला डोंगर झरा वाहतो समोर पाणी पिण्यासाठी त्यात सोडले कुणी जनावर शिवालय शांत भग्न गुंतले त्यात मन थेंब थेंब पाण्याचा होई अभिषेक अर्पण होती बरोबर शिदोरी झाली तीची न्याहरी दुपारी होईल काहीबाही त्यालाच काळजी सारी एकटेच चालायाचे स्वत:शीच बोलायाचे जंगल मोठे निबिड निघून एकटेच जायचे आला सुर्य माथ्यावर थेंब घामाचे अंगावर पायवाट संपता संपेना चालायाचे खूप अजून - पाषाणभेद (पुर्वप्रकाशित)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2903
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

आला सुर्य माथ्यावर थेंब घामाचे अंगावर पायवाट संपता संपेना चालायाचे खूप अजून miles to go before I sleep.

फोटूकडे पाहून तरी 'जंगल मोठे निबिड' काही वाटत नाही...

In reply to by सस्नेह

तो फटू म्या काढेल हाय म्हून टाकला. समोरचा डोंगर सोडून द्या पण बरोब्बर त्या मोठ्या झुडपाखाली एक ओहोळ या टेकडीखाली उतरत होता. मी एकटा गेलो होतो तेथे अर्थात अंगाला घाम वैगेरे काही आला नव्हता. एक छोटी टेकडीच आहे ती. बाकी सिच्चूवेशन म्या वर सांगेल तश्शीच व्हती.

In reply to by सस्नेह

थोडे अवांतर सांगतो. येथे दोन शेजारी टेकड्या आहेत. त्या दोहोंच्या वरती दोन छोटी मंदीरे आहेत. वर उल्लेखलेला फोटो अन ओहोळ त्या मोठ्या झुडूपामागे जावून खाली उतरतो. ही निर्मीतीही येथलीच आहे.

शेवटच्या दोन कडवी खास आवडल्या. एकटेच चालायाचे स्वत:शीच बोलायाचे जंगल मोठे निबिड निघून एकटेच जायचे आला सुर्य माथ्यावर थेंब घामाचे अंगावर पायवाट संपता संपेना चालायाचे खूप अजून क्लास!