लेखकनिनादयांनी बुधवार, 16/02/2022 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
नौका ही बांधलेली
राहील का बांधलेली
उरात भरूनी वारे
ही पाहतो निघालेली
वादळे येती तरी
लाटा फोडून ती गेली
थांबलो तेथेच मी
ती निघून गेलेली
मी असेन येथेच
वेळ नाही गेलेली
परत कधी येईल ती
आशा न विझलेली
प्रतिक्रिया