Skip to main content

चोरी

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 23/12/2015 16:47 या दिवशी प्रकाशित केले.

न्हाव्याच्या परसातल्या
तुळशी वृन्दावनातील
देव चोरल्याबद्दल
तू मला कोंडून
मारले होतेस
मग दिवसभर
तू डोळे
पुसत राहिलीस
मी तुला
टाळत राहिलो
मध्यरात्री जाग आली तेव्हा
तुझा हात छातीवर
होता
अन्
पश्चातापचे भाव ठेवून
शांत चेह-याने तू
निजलेली !

मग अशीच तू कधीतरी
निजलीस न उठण्यासाठी
ओल्या डोळ्यानी
मी स्वत:ला कोंडून
घेतले
सा-या जगाला टाळत
मध्यरात्री जाग आल्यावर
दार तसेच बंद होते
अन् छाती उघडी
तुझा हात नसलेली

आता मला पुन्हा
चोरी करावीशी वाटत
आहे......
हाय ! पण मीच आज
कोंडलेला आहे !

विजयकुमार.........

११.०८.२००९, मुंबई

लेखनविषय:

वाचने 3339
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

का रडिवतो भक्तांना !!!

खंडुराया काही चुकलं माकल असलं तर सांग तसं !
पण असा तरास दिऊ नगं..

प्र,मात्र नाखु


सुरेख

...
अन्
पश्चातापचे भाव ठेवून
शांत चेह-याने तू
निजलेली !
...

हाच स्पीड ब्रेकर खरा स्पीड ब्रेकर असतो तो कोणत्याही कायदा आणि नितीमत्तेच्या डोसांपेक्षाही अधिक परिणामकारक नाही का ?


न्हाव्याच्या परसातल्या
तुळशी वृन्दावनातील
देव चोरल्याबद्दल

तुळशी वृन्दावनातील, देव चोरल्याबद्दल हे समजले इथे कविने न्हाव्याचीच प्रतिमा का वापरली आहे ?


In reply to by माहितगार

हि कविता ह्याच सत्य घटनेवर आधारित आहे अशी चोरी माझ्याकडून झाली होती तीही आमावस्येला सत्यनारायण पूजेच्या दिवशी बाकी कविता काव्यांतरीत आहे


लहानपणी मी ही एका घरातल्या तुळशी वृंदावनातले देव चोरले होते आणि त्यानंतर आईने वळ उठेपर्यंत चोपला होता.

कविता पोचली भो आतपर्यंत... _/\_