ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते,
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते!
क्षण गुंतुनी जातोय जो पुढच्या क्षणी निःशब्दसा
त्याने युगांनाही लुटायाचे मला भय वाटते!
बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी
मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!!
हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे
धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!!
आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा
अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!!
-मनमेघ
टीप- ही गझल नाही. गझल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा तंत्राचा मुद्दा बाजूला ठेवून वाचावीत ही नम्र विनंती.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1527
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास!!!!
क्लास!!!!
अप्रतिम !
अप्रतिम !
कसले अप्रतिम लिहिले आहे ! ह्यातल्या एकेक कडव्यावर एकेक गोष्ट लिहिता येईल इतका खोल आषय आहे ! मस्तच !
लिहित रहा अन मुख्य म्हणजे इथे लिहित रहा !
धन्यवाद
पालीचा खंडोबा, प्रगो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रगो, नक्की लिहितो इथे:-)