मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

कन्या मानव्याची

gsjendra ·
लेखनविषय:
काव्यरस
मी अधीर मी बधीर मी रुधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसर्‍याची मी सौंदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण गजेंद्र भोसले आत्मशोध (काव्यसंग्रह)

लग्न म्हणजे काय असतं ?

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लग्न म्हणजे काय असतं हो बघायचं ठरतं , ओळख कुठून निघते . फोटो जातात घरी , देवाण घेवाण होते . फोटोवरून मग , बैठक होते घरी . मुलगा येतो बघायला , मुलीच्या दारी . पत्रिकेतले दोष गुण मान पान , देणं घेणं जुळून आले कि हे सारे , जळून येतात मनं बैठकी होतात , बस्ताही बसतो . लगीनघाईत व्यस्त , हरएक दिसतो शेरवानी , साडी सारंकाही ठरतं बघता बघता घर , माणसांनी भरतं . तारीख एक ठरते मंडपही सजतो . नवरीला पाहून मंडपी , मग नवराही लाजतो . एक मुलगा , एक मुलगी एक नवरा , एक नवरी अक्षदा अन आशीर्वाद घेऊन बारात जमली हावरी अक्षदा पडतात , आशीर्वादही मिळतो . नवरीचा भाऊ हक्काने , नवऱ्याचा कान पिळतो . निरोप घेता नवरी

तू फूल कुणाचे देखणे?

शिव कन्या ·
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

एकटा !

ब़जरबट्टू ·
लेखनविषय:
काव्यरस
घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला, मित्र आला, तो धुरात धुसमटलेला, आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला, सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला, आता तिघे, क्षण बावचळलेला.. इशारा घुमला, YZ मंदावलेला, येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला.. आता परत आम्ही दोघे, मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला... (सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)

मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी

तर्राट जोकर ·
लेखनविषय:
कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे.

एकरूप

रातराणी ·
लेखनविषय:
काव्यरस
घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात घाटमाथ्यावर विसावले, ऊन सोनेरी सावळे एकांती रमल्या मनोमनी, सावल्यांचे सोहळे कधी गुंफती हात हाती,कधी टिपत पाणी पारावर पाखरे गाती, उन्हापावसाची गाणी घाटमाथ्यावर

सदाफुली

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
कधीतरी आयुष्यात , सदाफूली व्हावं सुख बनून मातीत , आनंदाने फुलावं अंत स्वतःचा , माहीत असून देखील भेटणाऱ्या प्रत्येकाला , आनंदी करावं - अभिषेक पांचाळ

तुझं माझं नातं

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
रुसवे फुगवे काढण्यात नाते फुलत जाते न तुटण्याच्या आशेत ते सदा झुलत राहते भरती ओहोटी तर येतच असते माझी , तर कधी तुझी यात मती फसते - अभिषेक पांचाळ

शब्द प्रेम!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व: शब्द हेच शस्त्र, शब्द हेच अमूचे अस्त्र शब्द हेच युद्ध, शब्द हीच शांती शब्द हीच नीती, शब्द हीच अमुची मिती शब्द हेच कर्म, शब्द हेच फळ शब्द हेच दैवत, शब्द हेच अमुचे वैभव शब्द हीच दृष्टी, शब्द हीच सृष्टी शब्द हेच जग अमुचे, शब्द हेच जीवन अमुचे शब्द हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

-स

सुधीरन ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या ओल्या केसांचा गंध करीत नाही मला धुंद- शॅम्पू का बरे लावतेस? तुझे डोळे तसे अगदी गहिरे वगैरे आहेत- लेन्सेस का वापरतेस? तुझ्या ओठांची लाली थोडी कडू बघ लागते- लिपस्टिक कसलं लावतेस? तुझ्या गोब-या गालांना कुस्करणं मला आवडतं- त्यांना क्रीम का फासतेस? कितीदा तुला सांगितले नटू नकोस उगाचच तू- अशीच मला आवडतेस!