ढगाच्या आतले
विजेचे वेटोळे
सुटून मोकळे
डोंगरा डसते...तिथे ती भेटते
निबिड रानात
पोपटी पानात
झुकून बघत
मोतिया थेंबात ...किणकिण हासते
भणाण वाऱ्यात
लाटेच्या गाजेत
चांदीच्या वर्खात
किनारा कोरत ... माझ्याशी बोलते
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
868
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
स॑दीप, धन्यवाद !
In reply to मस्त! by चांदणे संदीप