मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप हा ताप नसतो, पोरा

सिद्धेश्वर विलास पाटणकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बाप हा ताप नसतो, पोरा आईचा पदर पकडून चाललास खूप खूप मोठा झालास विसरलास लेका बापाला आता उगा करतोयस तोरा II घास जरी आईने दिला तरी घासत तो बापच होता त्या तुमच्या पोटासाठी इतरांसमोर वाकत होता त्याच्या वाकण्याने तुला कणा दिला मान मरातब मिळाला अन तू लेका सर्व विसरला II दुध नाही पाजले पोटात नाही वाढवले पण ते दिवस मोजणारा तोच होता तुझ्या आगमनाने आनंदाश्रू गाळणाराहि तोच होता तुला रडताना बघून तळमळणारा पण तोच होता II आरं त्यो जर रडला असता तर तू कसा रं वाढला असता तुमहाला वाढताना बघून तो मात्र जगासमोर कायम वाकत होता तो ताप नव्हता तो तुझा बाप होता , फक्त तुझा बाप होता II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

वाचने 2101 वाचनखूण प्रतिक्रिया 11

In reply to by अभ्या..

दुर्गविहारी गुरुवार, 07/06/2017 - 11:23
"टोटल सियाप्पा" नावाचा मागे एक पिक्चर आला होता, तो ह्यांच्यावरच होता कि काय?

अहो सौरा ताई , मला कॉपीराईट ची साइन हवी होती . वर्तुळातला C कशाला घ्या , मुक्तच राहिलेलं बरं, म्हणून आपलं फक्त C सिलेक्ट केलं ... काय वेगळं बिगलं वाटलं कि काय आपल्याला ? नक्की अभिप्रेत काय होत तुम्हाला ? सौरा ताई .... चातुर्मास चालू आहे बाई , अस वेगळं मनात आणायचं नाही ...

तुमहाला वाढताना बघून तो मात्र जगासमोर कायम वाकत होता या ओळींना जबरदस्त अर्थ आहे सँडी भाय ... घ्याल तो अर्थ ... स्टँडिंग ओव्हेशन द्यायचं तर ह्या आणि अशा अर्थपूर्ण ओळींना ... काय म्हणता