Skip to main content

ही कविता फॉरवर्ड करा

ही कविता फॉरवर्ड करा

लेखक vcdatrange
Published on बुधवार, 12/07/2017 प्रकाशित मुखपृष्ठ
ही कविता फॉरवर्ड करा ही कविता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल पाच जणांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तु सापडेल नाही केली तर, भुत तुमच्या कानाखाली झापडेल दहा जणांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल नाही केली तर, पाठीवर मार बेसूमार मिळेल पंचवीस जणांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट चढेल, नाही केली तर कावळ्याचं शिट डोक्यावर पडेल पन्नास जणांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल शंभर जणांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

याद्या 2503
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ही कविता वाचू नका . नाही वाचलीत तर आयुष्य उत्तम होईल

कल्पना आवडली! Sandy