प्रतिभेचे देणे

लेखनविषय:
काव्यरस
ती ठिणगी होऊन येते अन वणवा होऊन छळते ती लकेर लवचिक होते अन गाण्यातून रुणझुणते ती कधी निखारा होते विझुनी मग होते राख उमलविते त्यातून फूल मग तिचीच फुंकर एक ती उल्केसम कोसळते उखडून दिशांचे कोन धगधगत्या चित्रखुणांची ती लिहिते भाषा नविन जे तरल नि अक्षर ते ते, जे अथांग, अदम्य ते ते, जे दूर असूनही भिडते, जे जटिल तरी जाणवते, ते तिचेच देणे असते…. …..किती घ्यावे? तरीही उरते !

सांज

लेखनविषय:
काव्यरस
अंग पेटून सांज जीव चिरते पापण्यांच्या पंखातून हळूच पाणी फिरते सय येता हुंदका कंठात फुटतो गहिवरलेल्या क्षितीजातून उदास रंग गळतो प्राणाच्या ओघळीत व्याकूळ शीळ तडफडते काळोखाच्या काठावरती दिवसाचे बन विझते खोल खोल गात्रात पिरतीचा मोहोर जळतो उरात आसवांचा झरा उचंबळुनी वाहतो

काही सांगायचे आहे

लेखनविषय:
काही सांगायचे आहे, सांगावया जमेल का? ज्यांनी ऐकायचे, त्यांना ऐकावया जमेल का? अनुभव टिपताना, मन शब्दबंबाळले शब्द त्यातला शहाणा, वेचावया जमेल का? रेष असो ललाटीची, वा असो तळहाताची नसणार सरळ, हे मानावया जमेल का? चित्रमय जग सारे, काय सोडू? काय भोगू? मयसभा कोणती ते, ओळखाया जमेल का? हाती लागला परीस, सर्वांच्याच हाती सोने धूर पिऊन सोन्याचा, जगावया जमेल का?

सरी

लेखनविषय:
काव्यरस
बेभान होऊन उठलं सभोवार काहूर अंधुक झाली डोंगराची लांब किनार बुंध्यातला पालापाचोळा विस्कटला गगनी सर्वञ माळरान आले अंधारूनी डोईवर मावळली अस्मानाची निळीभोर काया मातीत विरघळल्या सुकलेल्या काळ्या छाया माथ्यावर पांघरली गरजत मेघांनी शेज ऐन ज्वानीनं बहरली ढगांत वीज चिंब घनातून कोसळू लागल्या सरी ओले थेंब पाऊल हलकेच घुटमळले दारी

|| गणेश पूजा ||

लेखनविषय:
आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा करू .. || गणेश पूजा || चला करू गणेशाचे आज पूजन नवविधा भक्तीने आपण करू त्याचे अर्चन || धृ.|| दहा इंद्रियांनी करू मानस पूजा नसे तुजवीण भाव दुजा ||१ || दुग्ध घृत मधु दही शर्करा स्नाने अभिषेक करतो मी मनोभावाने ||२ || दुर्वा जास्वदीं फुले अर्पूनि चरणी आरती करूया धूप दीप लावूनी ||३ || निनादति मंगल वाद्ये ताल मृदूंग वीणा वाजे वैभव नमितो गणेशा रूप सुंदर साजे ||४ ||

|| अंगारकी ||

लेखनविषय:
आज अंगारकी चतुर्थी निमित्त मी केलेली कविता.... टिप :- ही कविता कोणाची टिंगल टवाळी किंवा भावना दुखावण्यासाठी लिहिलेली नसून "अंगारकीच्या या पवित्र दिनी" माझ्या मनःपटलावर उमटलेले तरंग आहेत. तोच शुध्द सात्विक भाव कवितेतून वाचकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणीक प्रयत्न केला आहे. या मधून कोणताही इतर अर्थ जर कोणत्या वाचकास दिसला तर तो केवळ माझ्या प्रतिभेचा दोष समजून वाचकांनी उदार मनाने मला क्षमा करावी.

मनातल्या मनात मी...

लेखनविषय:
काव्यरस
मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे! तुटून तारका क्षणात आसमंत लांघते उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे! गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

अश्वत्थामा

लेखनविषय:
मनाच्या एका खोलवर अंधार्‍या कप्प्यामधे कुठेतरी दडपून टाकलेली तूझी आठवण,.... कधीतरी उफाळून बाहेर येतेच अचानक, मला नकळत...... आणि मग कोरड्या पडलेल्या जखमा परत भळभळू लागतात मनावर मोठा दगड ठेवून तूला लिहिलेले ते शेवटचे पत्र इतक्या वर्षां नंतरही....
Subscribe to कविता