नवी मैत्री
लेखनविषय:
काव्यरस
मी ही कविता माझा नवीन झालेल्या मैत्रिणीवर केली आहे. तुमाला ही कविता कशी वाटली ही कंमेंट देउन जरूर सांगा.
नवी मैत्री
नवी मैत्री आहे
पण आहे खूप सुंदर
कुठे ही असलो तरी
कुणीच कोणाला देऊ नका अंतर....
आपलं ते गोड़ गुपित
एकमेकींना सहज पणे बोलून गेलो
तुझे तेच माझे म्हणत
एकमेकींमध्ये रमत गेलो...
नवीन आहे आपली मैत्री
तरी जपतोय आपण फुलासारखी
कायमच एकमेकींना साथ देऊ
एकमेकींच्या आनंदासाठी.
तृप्ती समीर टिल्लू
वाचने
2242
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
खतरनाक
मला तुमची कविता फारच आवडली. तुम्हीही माझ्या कविता वाचा आणि कशा वाटल्या ते जरूर सांगा.
आपलं ते गोड़ गुपित एकमेकींना सहज पणे बोलून गेलो तुझे तेच माझे म्हणत एकमेकींमध्ये रमत गेलो...या काव्यपंक्ती खूपच सुंदर आहेत. या मैत्रीच्या पुढील वळणांवरही कविता येऊ द्या.
मी ही जिल्बी माझ्या नवीन आलेल्या तांब्यातून टाकली आहे. तुमाला ही जिल्बी कशी "लागली" हे हतात तांब्या घेउन जरूर सांगा.
नवी जिल्बी
नवी जिल्बी आहे
पण आहे गोलगोल सुंदर
कशीही असली.. तरी खा
उगीच शेजारी देऊ नका चावल्या नंतर....
आपला तो शब्दप्रसवक तांब्या
टाकता टाकता बोलून गेलो
माझी जिल्बी कुरकुरीत म्हणत
कचकाऊन रोज टाकत गेलो...
नवीन आहे आपली कढई
तेल तापत्या घाण्यासारखी
खाल्ल्या नाही, तरी जिलब्या टाकू
आत्ममग्न आनंदासाठी.
तापत सोडलेलं पिल्लू
In reply to मी ही जिल्बी माझ्या नवीन by अत्रुप्त आत्मा
=)) =)) =))
In reply to मी ही जिल्बी माझ्या नवीन by अत्रुप्त आत्मा
नेहमी प्रमाणेच आवडल्या गेली आहे
पैजारबुवा,
In reply to बर्याच दिवसांनी जिल्बी कविता वाचायला मिळाली by ज्ञानोबाचे पैजार
घाणा उपवास सोडल्याबद्दल अभिनंदन करतो, टक्याला तांब्या "पोर'का वाटत होता
अवसान खात्री नाखु
तुम्ही वैभव दातार यांच्या कविता वाचा. तुम्हाला आवडतील.
खतरनाक