Skip to main content

सरी

लेखक चांदणशेला यांनी मंगळवार, 07/11/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
बेभान होऊन उठलं सभोवार काहूर अंधुक झाली डोंगराची लांब किनार बुंध्यातला पालापाचोळा विस्कटला गगनी सर्वञ माळरान आले अंधारूनी डोईवर मावळली अस्मानाची निळीभोर काया मातीत विरघळल्या सुकलेल्या काळ्या छाया माथ्यावर पांघरली गरजत मेघांनी शेज ऐन ज्वानीनं बहरली ढगांत वीज चिंब घनातून कोसळू लागल्या सरी ओले थेंब पाऊल हलकेच घुटमळले दारी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 728
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया