मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

|| गणेश पूजा ||

वैभवदातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा करू .. || गणेश पूजा || चला करू गणेशाचे आज पूजन नवविधा भक्तीने आपण करू त्याचे अर्चन || धृ.|| दहा इंद्रियांनी करू मानस पूजा नसे तुजवीण भाव दुजा ||१ || दुग्ध घृत मधु दही शर्करा स्नाने अभिषेक करतो मी मनोभावाने ||२ || दुर्वा जास्वदीं फुले अर्पूनि चरणी आरती करूया धूप दीप लावूनी ||३ || निनादति मंगल वाद्ये ताल मृदूंग वीणा वाजे वैभव नमितो गणेशा रूप सुंदर साजे ||४ ||

वाचने 1954 वाचनखूण प्रतिक्रिया 12

In reply to by सूड

ज्ञानोबाचे पैजार 08/11/2017 - 10:13
दहा तर दहा तुला काय फरक पडतो रे? त्या पेक्षा भावना बघ त्या जास्त महत्वाच्या... आरती प्रचंड आवडली आहे पैजारबुवा,

In reply to by सूड

अनन्त्_यात्री 08/11/2017 - 11:53
वापर करून करतात ती ऐंद्रिय पूजा असते- मानस पूजा नव्हे. मग (दहा अथवा कमी-जास्त) इंद्रियांनी मानस पूजा कशी करता येईल ही शंका येत आहे. की मन हे एक इंद्रियच गृहित धरले आहे? कवी / तज्ञांनी मार्गदर्शन करावे.

In reply to by अनन्त्_यात्री

वेळेला केळ आणि उपासाला सिताफळ अशी एक म्हण आहे. तदनुसार कधी कधी इंद्रीयांची मानसपूजा करायची वेळ येउ शकते माणसावर पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्त्_यात्री 08/11/2017 - 14:20
||आपल्या मर्मग्राही मार्गदर्शनामुळे अभूतपूर्व अंतर्दृष्टी मिळाली. शब्दांचे वैयर्थ्य व संकल्पनांमधील परस्परसंबंधांची यथार्थ कल्पना आली|| ||धन्यवाद || :)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तदनुसार कधी कधी इंद्रीयांची मानसपूजा करायची वेळ येउ शकते माणसावर
त्या मानसपूजेवरही एखादी फक्क्ड कविता येउदेत. ईक्षुदंडांसह!! ;)

In reply to by सूड

अनन्त्_यात्री 08/11/2017 - 16:19
टायटल तर ठरले. आता फक्कड कवितेचे शिवधनुष्य उचलण्याची व त्यास प्रत्यंचा लावण्याची नम्र विनंती मिपाविडम्बनशिरोमणींना करण्यात येत आहे. फार कळ सोसायला लावू नये.