( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे.
मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.)
"अरे अजिंक्य, सगळीकडे हेच चालू आहे. न्यूज वर, पेपरात, रेडीओवर.. बाहेर तर हिंदुमुस्लिम दंगल उसळली आहे... देव जाणे काय होणार आहे..? आपण आपल्या गावापासून इतक्या लांब. आई-बाबांचं काय झालं असेल? त्यांना किती काळजी लागून राहिली असेल. टेलिफोन बूथ सुद्धा बंद आहेत." वैभव अजिंक्यशी बोलत होता.