Skip to main content

कथा

वादळ (अंतिम)

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 05/02/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे. मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.) आधीचा भाग.. वादळ (वैभवने थर्मासमधली कॉफी ओतून मगात घेतली आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चित बसून पुस्तक वाचू लागला. कितिवेळ गेला कोणास ठाऊक... अचानक..दारावर थाड थाड आवाज आला...."दरवाजा खोलो... प्लिज दरवाजा खोलो....

आजार्‍याकडून डॉक्टरने ऐकणं हेच उपचाराचं प्रभावी औषध आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 05/02/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि भाई नेरूरकर एकाच गावातले.एकाच शाळेत शिकत होतो.भाईचे वडील डॉक्टर होते.निरनीराळ्या खेड्यात जाऊन ते आजार्‍याना भेटून उपचार करून येत असत.पण नंतर नंतर त्याना त्यांच्या मोटरबाईक वरून प्रवास जमे ना. तोपर्यंत भाई ग्रॅन्डमेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पुरं करून एम. डी.

वादळ..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 05/02/2009 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे. मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.) "अरे अजिंक्य, सगळीकडे हेच चालू आहे. न्यूज वर, पेपरात, रेडीओवर.. बाहेर तर हिंदुमुस्लिम दंगल उसळली आहे... देव जाणे काय होणार आहे..? आपण आपल्या गावापासून इतक्या लांब. आई-बाबांचं काय झालं असेल? त्यांना किती काळजी लागून राहिली असेल. टेलिफोन बूथ सुद्धा बंद आहेत." वैभव अजिंक्यशी बोलत होता.

कोल्हे-कुई

लेखक पुष्कर यांनी बुधवार, 04/02/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
(पंतांच्या पगडीच्या प्रवासातल्या, पुष्करच्या प्रेमप्रकरणातल्या प-पच्या पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पुष्करने पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.) केशवाचे कपट, काकांची कमाल पुनःसंपादन आणि विस्तारास्तव तूर्तास कथा काढून टाकत आहे. क्षमस्व.

चिनी म्हण--आणि रामदुलारी.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 30/01/2009 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगावं,खरं ओकूं नये! "स्पिक ट्रुथ डू नॉट स्पिक-औट ट्रुथ" रामदुलारीची आणि माझ्या भावाची अलीकडे बरीच गट्टी जमली आहे.रामदुलारी कधीकधी आमच्या घरी येतो.कधी माझ्या भावाच्या क्लिनीक मधे माझगावला जातो नाहीतर माझ्या भावाला फोन करून विचारून ते दोघे कधी गिरगाव चौपाटीवर तर कधी जुहूच्या चौपाटीवर सूर्यास्त पहायला आणि गप्पा मारायला भेटतात.

फुस्स् ऽऽऽ

लेखक शक्तिमान यांनी गुरुवार, 29/01/2009 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
        फुस्स् ऽऽऽ     अखेर माझ्या सायकलच्या जीर्ण टायरने पुण्यातील रस्त्यांसमोर शरणागती पत्करली (यात नवीन काहीच नव्हते). परंतु या शरणागतीमुळे एक गोष्ट माझ्या पथ्यावरच पडली... कधी नव्हे ते क्लास बुडवायची नामी संधी चालून आली होती. आणि "opportunity knocks the door once" या सुप्रसिद्ध वचनाला अनुसरून मी ती संधी गमवायचा मूर्खपणा अजिबात केला नाही.     मी माझी सायकल घेऊन आपल्या नेहमीच्याच सायकल मार्ट मध्ये गेलो. मी घडलेला सगळा प्रसंग तेथील माणसाला सांगितला.

अधिक, अधिक आवडणारं जग.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 23/01/2009 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
" मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही आणि मानवाला ते सोसावं लागत असतानाही सुख साध्य होण्याजोगं आहे." मी अलीकडे गोव्याला गेलो होतो.विमानात माझ्या बाजूच्या सीटवर बसलेले गृहस्थ गोव्यातले स्थाईक रहिवाशी होते.माझं त्यांच प्रवसात बोलणं झालं त्यावेळी मला हे कळलं. त्यानी माझ्या गोव्यातल्या मुक्कामात दोन दिवस वेळ काढून आपल्या गावात येण्याचा आग्रह केला.मला सुद्धा गोव्यातल्या खेडेगावात जायला आणि जाऊन राहायाला अंमळ बरं वाटतं.

एका ऑफिस सेक्रेटरीची कैफियत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 18/01/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
"ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं." माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे.तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? असं मी विचारल्यावर ती म्हणाली, "मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं.मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो.

डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 17/01/2009 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद यादव
डॉ.आनंद यादव
आमच्या औरंगाबाद शहरात काल, महाबळेश्वर येथे होणार्‍या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्याक्षाची निवड होणार होती. आम्ही धावत-पळत मसापच्या (मराठवाडा साहित्य परिषद) कार्यालयात पोहचलो. गर्दी दिसली की डोकावून पाहण्याची सवय, त्यामुळे गर्दी झालेली होती. एकाला विचारले कोण ? तर तो म्हणाला डॉ.आनंद यादव ! डॉ.