कथा
आपण सगळे एकमेकासाठी शिक्षक आहोत.
प्रो.देसायांच्या घरी आज आम्ही चर्चा करण्यासाठी जमलो होतो.चर्चेचा विषय होता "शिक्षक".
भाऊसाहेबानी बर्याच विद्वानाना ह्या चर्चेसाठी बोलावलं होतं.नेहमी प्रमाणे काही लोक शिक्षक म्हणून आपला अनुभव सांगून गेले.काहीनी शिक्षक झाल्यामुळे आपल्या जीवनात काय काय समस्या आल्या त्याचे पाढे वाचले.काहीनी शिक्षक आणि मुलांमधल्या पारस्पारिक प्रभावाबद्दल मनोरंजक माहिती सांगितली.भाऊसाहेबानी आपले पण रुईया कॉलेजमधले गमतीदार अनुभव सांगितले.
मात्र एका वयस्कर व्यक्तिने "शिक्षक" म्हणजे फक्त शाळेत किंवा कॉलेजमधे शिकवणारी व्यक्ति असं न मानता,मोठ्या दर्शनशास्त्राच्या दृष्टिने किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिने चर्चा करून सगळ्या
शिरोड्याचं हवामान.
बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो.
आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो.
असंच एक स्वप्न.
मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती. सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.
पॅपिलॉन - काही अनुत्तरीत प्रश्न
पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव.
पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले.
तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता.
न्यू गियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला.
मी माझ्यातच संतुष्ट आहे.
"माझ्या अशुद्ध बोलण्याच्या पद्धतीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही फरक झालेला नाही.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं."
मी एकदा एका लायब्ररीत पुस्तकं चाळीत बसलो होतो.दोन तीन पुस्तकं मला आवडली आणि वाचायला न्याविशी वाटली.ती घेऊन मी काऊंन्टरवर गेलो.काऊंटरवर बसलेली व्यक्ति मला जरा वयाने लहान वाटली.मी कुतुहलाने त्याला विचारलं,
"तू शाळेत शिकत असशिलच."तो हो म्हणाला.
मिसळपाव