लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी शुक्रवार, 10/04/2009 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याला आपण कांद्दाची भजी म्हणतो त्याची रुचिदार चव कुणाला माहित नसेल असं वाटत नाही.एव्हडं काय आहे त्या भज्यात?असं कुणी विचारलं तर काय सांगणार?.कुणी विचारतं की ही भजी क्षुधावर्धक आहेत का?की कुणी विचारतं ही भजी खाऊन पोट भरता येतं का?
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी बुधवार, 08/04/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
"तिला सहनशीलता म्हणा,किंवा सहिष्णुता म्हणा,ती अंगात असली की दुसर्याला सन्मान द्दायला पुढाकार घेतला जातो आणि सरतेशेवटी स्नेह निर्माण होतो.एखाद्दाची खरीच पूर्ण ओळख होणं जरा कठीण आहे पण त्याच्याशी स्नेह करून राहायला किंवा त्याचा स्वीकार करायला हरकत येत नाही"
नेहमी प्रमाणे काल माझी आणि प्रो.देसायांची तळ्यावर भेट झाली.भाऊसाहेबांबरोबर एक गृहस्थ होते.माझी ओळख करत देत भाऊसाहेब म्हणाले,
"हे शुभ्रतो चक्रबोरती.आमच्या कॉलनीत राहायला आले आहेत.आमच्या कॉलनीत जवळ जवळ बारा बिल्डिंग्स असून देशातले निरनीराळ्या प्रांतातून आलेले लोक राहतात.
शुभ्रतो मुंबईत आल्याआल्या प्रथम वसईला राहिले.नंतर ते गोरेगाव इस्टला बर
लेखकस्वाती दिनेशयांनी मंगळवार, 07/04/2009 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
अरुण शेवतेंचं 'हाती ज्यांच्या शून्य होते' वाचलं तेव्हाच 'मनश्री'शी ओळख झाली आणि तिला अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छाही..
कारण तिच्या हातात फक्त शून्यच नाही तर अंधारभरलं शून्य होतं पण त्या अंधारालाही उजळायला लावेल अशी तिची जिद्दकथा.. तिची,तिच्या आईची आणि सार्या कुटुंबाची! मनश्री जन्मली तिच मुळी डोळ्यात अंधार घेऊन,तिला जन्मत: बुब्बुळच नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय फाटक्या ओठाची भर, मेंदूची वाढ,मणक्यांची क्षमता, मुकेबहिरेपणा .. अजून कायकाय तिच्यापुढे वाढून ठेवलं होतं ते समजलं नव्हतं.
उदय आणि अनिता सोमण ह्या मध्यमवर्गीय दांपत्याचे हे लेकरु देवाचं उलट दान घेऊन जन्मलं.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी शनिवार, 04/04/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
" मी वर्तमानकाळात राहण्याचा प्रयत्न करतो.शुद्ध हवेची नेहमीच महक घेतो.माझ्या पत्नीबरोबर सकाळीच एक कप कॉफी झुरकण्यात मजा लुटतो.बागेतली पिवळी जर्द फुलपाखरं उडताना पाहून आनंदी होतो."
काही व्यक्तींच्या नशीबात सदैव दुःखच असतं.अर्थात नेहमी सुखाचे दिवस मिळणं जरा अपवादात्मक आहे.पण जीवन जगायला सुखदुःखाची कमी अधिक प्रमाणात जरूरी भासते.होऊन गेलेल्या घटना आठवणीत आणून मन रिझवण्यात मजा येते.
लेखकदशाननयांनी शनिवार, 04/04/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र...
************************************
किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी गुरुवार, 02/04/2009 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..ति म्हणाली
माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि......ति सिरियस् झाली होति
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.....तो
वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो.
लेखकविशाल कुलकर्णीयांनी गुरुवार, 02/04/2009 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे गाणे तुझे नाही
तुझे असणे तुझे नाही
ते किंचित हंसणे तुझे नाही..
तो गंधार, तो मल्हार
असतील ते सुर तुझे,
पण त्याचे वेड तुझे नाही !
तुझ्या ओठीचा शब्द
तुझ्या गळ्याचे सुर
व्यसन कोकीळे ते तुझे नाही !
तुझ्या सुरातली तंद्री
तुझ्या स्वरातली धुंदी
ते धुंदावणे तुझे नाही !
तानपुर्याची मधुर तान
किंचित लवणारी सुरेल मान
ते वेडावणे तुझे नाही !
तुझे सुर श्वासात भिनलेले
त्या स्वरांसह श्वासांची
गती वाढणे तुझे नाही!
तो हक्क आम्हा रसिकांचा
तुझ्या गळ्याच्या गुलामाचा
ते भाग्य कोकिळे तुझे नाही
स्वरकोकिळा मा. लतादीदींच्या एका वाढदिवशी ही कविता केली होती.
विशाल