Skip to main content

कथा

" छाया "

लेखक शितल यांनी मंगळवार, 31/03/2009 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
जेमतेम ५ फूट उंची असलेली, सावळी, गोल चेह-याची, काळेभोर बोलके डोळे असलेली, खांद्या पर्यंतचे केस कधी मोकळे सोडलेले, कधी एक पॉनीटेल बांधलेली, तिच्या गोड हास्याने अजून गोड वाटणारी, बडबडी "छाया", तिची ही दुर्दैवी कहाणी. एका निष्पाप, गोड मुलीचा एक दुर्दैवी अंत आठवून आजही मन अस्वस्थ होते. त्यावेळी मी शाळेत असेन, आणि ती कॉलेज मध्ये. आमच्या मध्ये ५/६ वर्षाचे अंतर असेल. त्यावेळी आम्ही एका वाड्यात राहत होतो. आमच्या शेजारी दोन मुली राहत होत्या, दोघी बहिणी - बहिणी. एकाच कॉलेज मध्ये एकाच वर्गात होत्या, त्यांची छाया ही मैत्रीण.

ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 29/03/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
अलका आमोणकरला मी एक सुसंस्कृत शिक्षीका म्हणून मानतो.कोकणातल्या एका खेड्यात ती तन्मयतेने एका शाळेत शिक्षीका म्हणून काम करायची.आणि अजूनही करते.ती एकदा आमच्या घरी आली होती.मी तिला सहजच म्हणालो, "काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?" अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी आहे हे मला माहित होतं. लागलीच ती मला म्हणाली, मी जरी माझ्या कामावर प्रेम करीत असले तरी तसं करणं एकदम सोपं नाही.मी आठवीच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवते.त्या मुलांची शिकायची हौस खूपच आहे.एखाद्

डरना मना है

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 28/03/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉलेजात असतानाची गोष्ट. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाच्या परिक्षेचा शेवटचा दिवस. जून महिन्याचा दुसरा आठवडा. माझे दोन्ही सिनिअर रुम पार्टनर आदल्या दिवशीच परिक्षा आणी त्यानंतरची पार्टी संपवुन घरी गेलेले. माझी एक तोंडी परिक्षा बाकी असल्याने अजुन दोन दिवस थांबणे भाग होते. त्याचबरोबर रुम बदलायची असल्याने पॅकिंग करायचे होते आणी वस्तु दुसर्‍या रुमवर हलवायच्या असल्याने घरी जाता येत नव्हते. माझे मुंबईचे मित्र दोन दिवसांसाठी घरी निघुन गेल्याने मी एकटाच उरलो होतो. संध्याकाळी ५:३० ला परिक्षा संपल्याची घंटा वाजली आणी सगळेजण खुष होऊन एकमेकाना शुभेच्छा देऊन घरी जाण्याच्या तयारीला लागले.

ताई आणी दादा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/03/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
दादा :- या या या , या ताई... ताई :- नमस्कार दादा. कसा आहेस ? दादा :- मी अगदी मनसे मजेत आहे, तु कशी आहेस ? आज अचानक इकडे कसे काय येणे केलेस ? ताई :- अरे दादा, आज गुढीपाडवा, तुला आणी तुझ्या पक्षाला सुयश आणी किर्ती मिळो आणी तुझा पक्ष खुप मोठा होवो अशा शुभेच्छा द्यायला आलिये मी. दादा :- खरच गहिवरुन आले बघ, तुमच्या सारख्यांचे पाठबळ खुप मोलाचे वाटते. ताई :- अरे वरचेवर भेटत नसलो आणी तु आता घर सोडून गेलास म्हणुन काय झाले ? मी मनानी कायम तुझ्याच मागे उभे होते.

वर्तमानात राहाण्याचा फायदा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 27/03/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
"अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं." किशोर पाटलाचा भाऊ एव्हड्या तरूण वयात आत्महत्या करील असं वाटलं नव्हतं.मी किशोर पाटलाला योगायोगानेच एकदा ठाण्याला गेलो होतो तेव्हा भेटलो.गोविंदराव सामंतांच्या घरी ते एम.एच हायस्कूल मधून निवृत्त झाले म्हणून निरोपाची पार्टी होती. गोविंदराव माझ्या पत्नीच्या मावशीचे यजमान.त्यांचे अनेक विद्दार्थी ह्या पार्टीला आले होते.

एक डाव भुताचा.....(?)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/03/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी एकदाची वेड्यांच्या इस्पितळाची गाडी वाड्याच्या दारापर्यंत येवुन पोचली. पांढर्‍या गणवेशातील चार सेवकांनी कुशाक्कांना पकडुन गाडीत घातले आणि भर्रकन गाडी निघुनही गेली. सगळं कसं अगदी अचानकच घडलं,... नाही ? म्हणजे बघा, साधारण दोन - अडीच महिन्यापुर्वी त्यांच्या सुनेचा, रंगुचा अपघाती मृत्यु झाला. तिचा नवरा, लंगडा राम्या त्यानंतर महिन्याभरातच कुठेतरी बेपत्ता झाला, मग महिन्याभराने त्याचं प्रेतच सापडलं. त्या धक्क्याने कुशाक्काला वेड लागलं. शेवटी आम्हीच इथल्या वेड्याच्या इस्पितळात तिच्याबद्दल माहिती दिली आणि काल तर ते लोक येवुन घेवुनही गेले कुशाक्काला.