Skip to main content

कथा

नशिबवान

लेखक लाल टोपी यांनी शनिवार, 15/12/2012 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
जेफ्री आर्चरच्या 'अला चार्ट' कथेचा स्वैर अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे...
आर्थर होपगार्ड सैन्यदलाच्या सेवेतुन दिनांक ३ नोव्हंबर, १९४६ रोजी सेवामुक्त झाला आणि महिन्याभरातच तो सैन्यदलात जाण्यापुर्वी काम करीत असलेल्य ईंग्लड मधील कोव्हेंट्री शहराच्या बाहेर असलेल्या ट्रंफ कार कंपनीत दाखल झाला. गेली पांच वर्षे त्याने सैन्यदलासाठी बहादुरीची कामे केली होती आणि त्या कामाचे बक्षीस म्हणुन युध्द संपल्या नंतर काहीतरी चांगली संधी मिळेल अशी आशा मनात ठेऊन तो परतला होता. परतल्या नंतरची वास्तुस्थिती मात्र वेगळीच आहे असे त्याला जाणवले. कारण त्याला अपेक्षीत असा प्रतिसाद कोठुनही मिळत नव्हता.

माळरानी खडकात जेव्हा रुजते बियाणे...

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 13/12/2012 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता. अर्ध्या एकर शेतात पेरलेल्या भुईमुगाच्या विरळ मोडांकडे हताशपणे पाहत रायाजी बसला होता. वीस किलो बी त्याने बाराशे रुपयांचे घेतले होते.अजून जगुनानाचे पैसे दिले नव्हते.

वालक्या

लेखक वसईचे किल्लेदार यांनी बुधवार, 12/12/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी माझ्या बऱ्याच आठवणीत असणारा आमचा वालक्या... माझ्यापेक्षा साधारण 10-15 वर्षे मोठा असेल. नक्की सांगता येणार नाही. सर्वांसाठी फक्त वालक्याच. त्याच्याही नजरेत कधीही कुणासाठीही दुजाभाव दिसला नाही. कुणाच्याही खिजगणतीत नसणारे हे एक अजब रसायन. बहुधा देवाला दुर्लक्षून जन्मला असावा. त्यामुळेच ईतर कुणीही त्याच्याकडे फारसे लक्ष देतांना पहाण्यात आले नसावे. सकाळी सकाळी शाळेच्या समोर, रस्त्याकडेला हा उभा. अंगात काळसर, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि खाकी विजार. ती हि अर्धी. पायात चप्पल असल्याची कधी पहिलीच नाही. पाय सतत चालते, पण जागीच.

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

प्रारब्ध

लेखक शैलेंद्रसिंह यांनी सोमवार, 10/12/2012 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या वेळी चहा पिता पिता दिवसभरचे प्लान्स करत होतो. तेव्हढ्यात बेल वाजली. शेजारच्या नवलेकाकु आत आल्या... "बातमी कळली का?" "कसली बातमी" "अरे ते चौथ्या मजल्यावरचे जोशीकाका वारलेत ना सकाळी सात वाजता" "अच्छा" अच्छा हा उद्गगारवाचक शब्द कुठेही मुर्खासारखा वापरतो आणि मग ओशाळल्यासारखे होते. तशी आमची बिल्डिंग नवीनच होती आणि सगळी नवीन कुटुंबच होती त्यामुळे एकमेकांशी फ़ारशी ओळख नव्हतीच. आम्ही तर दिवसभर ऑफ़िसमधे चकाट्या पिटणारी लोकं आम्हाला तर नावावरुन चेहरा लक्षात येण्याची शक्यताच नव्हती. जोशीकाकांना कधी पाहिले असावे का असा विचार मी करुन लागलो. पण काही चेहरा लक्षात येत नव्हताच.

हझारो ख्वाहिशे ऐसी...समाप्त

लेखक इष्टुर फाकडा यांनी रविवार, 09/12/2012 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग एक : http://www.misalpav.com/node/23033 भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154 भाग तीन : http://www.misalpav.com/node/23248 ....आम्ही तळजाईची वाट चढत होतो आणि मी मनात खूप वर्षांपूर्वी उतरलेली सिंहगडाची वाट पुन्हा उतरत होतो...सोसायटी मधली आम्ही सगळी पोरंसोरं मिळून सकाळी सहाची पीएमटी विश्व हॉटेलपासून पकडून गडावर गेलो होतो. सिंहगड वॉज माय टर्फ. अख्खी कल्याण, अवसरवाडी तरफ आमच्या घरातल्या सगळ्यांना नावानिशी ओळखत असे.

२१ डिसेंबर

लेखक चाफा यांनी शनिवार, 08/12/2012 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोकॉपी मशीन समोर उभ्या राहिलेल्या प्रोफेसर देवधरांनी विचारांच्या भरात आकडा पंच केला 'एकवीस'. मशीनचा झूSS असा आवाज सुरू होताच ते भानावर आले, आणि त्यांना आपली चूक उमगली. हल्ली बरेचदा त्यांचं असंच व्हायचं, ते एकवीस डिसेंबरचं मनावर घेतल्यापासून. देवधरांना बहुतांशी शास्त्रज्ञ मॅड सायंटिस्ट म्हणायचे, म्हणजे देवधर खरंच वेडे वगैरे नव्हते पण पराकोटीचा आनंद आणि पराकोटीची निराशा यांच्यामधली भावना त्यांना कधी माहीतच नव्हती.