Skip to main content

कथा

बडबड

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 12/09/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
"ए हळू रे!" "काय हळू? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?" "नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?" "ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!" "आणि तू माझी गाय" "पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना." "नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!" "काही नाही होत गं... माझा कंट्रोल.................

आधी बसू मग बोलू.

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 10/09/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही.