Skip to main content

कथा

पुजाच्या फेसबुक अकाऊंट मधे शिरलेला आत्मा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 09/02/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज ला सुटी असल्याने पूजा निवांत होती.... सकाळी कॉफी चा मग घेऊन ती कम्प्युटर च्या टेबलावर आली अन डेस्क टॉप चालू केला.. फेस बुकच्या अकौंटर गेली अन पोस्ट वाचू लागली .. डाव्या कोप~यात नजर गेली अन कुणाची तरी मैत्री विनंती आलेली तिला दिसली.. तिने क्लीकले व फोटोवर क्लीकून त्या अकांऊंट वर गेली... राहुल पानसे नी ती मैत्री साठी विनंती केली होती.....सॉफ्टवेअर इंजिनिअर..राहणार पुणे ..सद्ध्या फरीदाबाद...पूजा वाचत होती.. तिने त्याचे मित्र चेक केले बरेचसे मित्र पुण्यातलेच होते एकूण १५-२० मित्रांची यादी होती.. पूजा विचारात पडली की याने ओळख नसताना का मैत्री याचना केली असेल? फोटो तर खरा वाटत होता..एकदा वाट्ल

"संवाद"

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 09/02/2013 02:23 या दिवशी प्रकाशित केले.
..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चक्र तेथुन उडुन 'उध्दवा'च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले ! . . . अगदी काल परावाची गोष्ट . ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती नगरीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्‍यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ... " हे बघा वत्सांनो , मला तुमची आगतिकता समजते ...पण तुम्हाला अजुन तुमचे नशीब शोधायला बाहेर पडला नाहीत .ते स्वतः येवुन तुम्हाला कसे भेटेल ? असो .

जावई बसले अडून

लेखक अधिराज यांनी मंगळवार, 05/02/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.

मोस्ट ईलिजिबल बॅचलर.....

लेखक जयू कर्णिक यांनी बुधवार, 30/01/2013 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइलची बेल वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, ‘०२२’ आणि पहिले चार डिजिट… अरे हा तर ‘बॉंबे हाऊस’ मधून आलेला, म्हणजे टाटा मोटर्स मधील कुणा मित्राचा फोन असणार. ‘हॅलो…’ आता कुणा मित्राचा परिचित आवाज कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, इझ जयंथ कार्निक देअर?’ – जयंत कर्णिक ची एवढी वाट लावली म्हणजे मित्रांपैकी कोणीच नाही.

विसरभोळा

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 21/01/2013 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
[ओ. हेन्री यांच्या 'द रोमान्स ऑफ द बिझी ब्रोकर' वर आधारित] हार्वे मॅक्सवेल एक यशस्वी शेअर ब्रोकर होते. पीचर त्याच्या कार्यालयात स्वीय स्वचिवाचे काम करत होता. तो गुरूवारचा दिवस होता. सकाळी साडेनउला मॅक्सवेल नेहेमीप्रमाणे घाईघाईने आपल्या स्टेनोबरोबर ऑफिसमधे आले. स्टेनोचा बदललेला आविर्भाव बघून एरवी मख्ख असणार्‍या पीचरच्या चेहर्‍यावर एक क्षण आश्चर्याचे भाव नकळत उमटले. एका क्षणार्धात "गुड मॉर्निंग, पीचर" म्हणत मॅक्सवेल चित्त्याच्या चपळाईने आपल्या टेबलाकडे झेपावले. ग्राहकांची पत्रे आणि तारा यांचा एक मोठा ढीगच त्यांची वाट बघत होता. स्टेनो आपला रिवाज सोडून अजूनही मालकिणीच्या रूबाबात वावरत होती.

झेन कथा - सहनशिलता

लेखक jaypal यांनी शनिवार, 19/01/2013 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील अलीकडील काही लेख, त्यावरील प्रतिसाद आणि त्या प्रतिसादांचे पडसाद वाचुन मला ही झेन कथा आठवली. योग्य/अयोग्य, पाप/पुण्य, साक्षर/निरक्षर, इश्वरवादी/निरीश्वरवादी ई. वादग्रस्त वातावरणात थोडासा शितल शिडकाव करावा हा हेतु. zen चंदन पुर गाव. या गावात लहु लोहाराच एक दुकान असतं.

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 18/01/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मन्नूस, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्र लिहिण्यास उशीर झाल्या बद्दल क्षमस्व. आज मी मुद्दाम प्रयत्न करून तुला मोठे आणि सविस्तर पत्र लिहित आहे, कारण इथल्या नवीन शाळेतल्या मॅडम ज्यांना इथे बाई म्हणतात त्या नेहमी मला माझ्या गचाळ हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाच्या चुकांसाठी खूप रागावातात. इतक्या मोठया शहरातून आलास तरीही तुझं लेखन इतकं अशुद्ध आणि अक्षर इतकं खराब कसं असं त्या नेहमी म्हणतात. पण त्यांना माझे निबंध मात्र खुप आवडतात, ते त्या सगळ्या वर्गांमधे वाचुनही दाखवतात. त्या माझे नाव आंतर शालेय निबंध स्पर्धेत पाठवणार आहेत, आणि माझा नंबर जिल्ह्यातुन पहिला आलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या.

"ते" - ६

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 11/01/2013 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
"ते" -१ "ते" -२ "ते" -३ "ते" -४ "ते" -५ एक तरुण जीव घेऊन पळत होता आणि त्याच्या मागे एक विचित्रच जनावर सुटलेलं होतं. आम्ही दोघेही पुढे धावत आल्यावर ते थोड बिचकलं, अंधारात ते नक्की काय आहे ते कळत नव्हतं. उंच, काटकुळं. फुसफुसण्याचाही आवाज येत होता. ते पुढे येण्याचा प्रयत्न करत होतं. तो तरुण आमच्या पायाशी येऊन पडलाच.

जुन्या काळातील गोष्ट

लेखक अनिल तापकीर यांनी शुक्रवार, 11/01/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
साऱ्यांची घरट्यात परतण्याची वेळ ,म्हणजे शेतकऱ्यांची शेतातून, गुरांची रानातून ,पक्षांची आकाशातून, मुलांची शाळेतून आदी,तर अश्या सांजवेळी आम्ही सारी पोरं सुताराच्या ओट्यावर जमायचो आणि तिथे चार पाच म्हातारे बसलेले असायचे.म्हणजे पत्ते कुटीत बसायचे आम्ही पोरं तिथं गेलो कि ते आम्हाला जागा करून द्यायचे.