Skip to main content

कथा

स्टोरी सलील ची ...

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 25/10/2012 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच सलीलचा फोन आला ,चांगला तासभर बोलला .मीही भारावलो ,चक्क अमेरिकेतून फोन! बोलणे झाल्यावर फोन खाली ठेवला आणि माझं मन सलीलच्या भूतकाळात निघून गेलं... ३० वर्षांपूर्वीची गोष्ट .सलील ,माझ्या भावाचा एक मित्र .याचे वडील एका कारखान्यात मॅनेजर. पण स्वभाव लहरी. घरी बायको आणि एक मुलगा.पण त्या काळात सुमारे ३० हजार रुपये महिना पगार असलेली नोकरी सोडून माथेरानला हॉटेल काढायचे खूळ डोक्यात शिरले. नोकरी सोडून हॉटेल काढलेही ,पण पार्टनरने फसवल्यामुळे यांच्या हाती राहिले धुपाटणे!

वेंकट

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 24/10/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी वेंकटेशन अय्यर . हस्तांदोलन करीत तो म्हणाला .आज तो नावाने आमच्या टीम मध्ये सामील होत होता . ओमान मधील “पी डी ओ “ या प्रथितयश कंपनीच्या आलिशान कार्यालयात आमच्या ग्रुप मध्ये आजपासून हा नवीन “मल्लू” जॉईन झाला होता. अशा अनेक “मल्लू”सोबत आजतागायत काम केले असल्याने त्यात विशेष काहीच वाटले नाही...आमच्या ग्रुप चा अन्वर नावाचा दुसरा एक मराठी सदस्य मला हळूच मराठीतून म्हणाला...”चला, आणखी एक यंडूगुंडू आले रे” ...मीही हसून अन्वर कडे पहिले आणि कामात गर्क झालो... लंचब्रेक मध्ये सगळेजण हास्यविनोद करत असताना अय्यर मात्र शांत आणि गंभीर होता ...

अवतार

लेखक शैलेंद्रसिंह यांनी बुधवार, 24/10/2012 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो.... सांगा आता हा मनुष्य जगातला सर्वात वेगवान माणुस नाही का?

देस-परदेस!

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 23/10/2012 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
कुवेत एअरवेज चे फ्लाईट ३११ मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावरून आकाशात झेप घेत होते ,तसतसे आशिष चे विचारही मणामणाचे ओझे उतरावे तसे हलके होत होते . गेले१० महिने आणि त्या काळातल्या घडामोडी एखाद्या चित्रपटासारख्या त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या .गेले एकदोन दिवस नव्हे,तर चक्क १० महिने आपण असे झपाटल्यागत कसे काय वागत होतो? याचा वचार करूनही त्याला उत्तर सापडेना ! रचना ! एखाद्या स्वप्नातल्या परीसारखी ! गोव्याला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना पहिल्याच दिवशी एक नवीन चेहरा दृष्टीस पडला .नजरानजर झाली ,आणि तिने चक्क स्माईल दिलं!

संवेदना ...!

लेखक तुझा बबल्या यांनी बुधवार, 03/10/2012 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर मार्टिनच्या शुभेच्छायुक्त निरोपाच्या शब्दांनी आमचा प्रवास सुरु झाला. आठ दिवसांच्या कॅम्प साठी आमच्या मिनीबस ने लीड्स कडे धाव घ्यायला सुरवात केली . खर तर सारेच आल्हाद दायक वातावरण होते .फक्त माझा मूड मात्र थोडा बिघडलेला होता, कारण ही तसेच होते . अगदी ऐन वेळी मला कॉवेन्ट्री गटातून काढून लीड्स गटामध्ये टाकले गेले होते . सुरवातीला मी ,विशाल आणि मिनेश तिघे भारतीय कॉवेनट्री गटात होतोत. विशाल आणि मी तर दोघेही मराठी म्हणून मग सोबतच नाव नोंदणी केली होती. सोबत जावू ,सोबत राहू ,सोबत आपले मित्र असले कि कॅम्प कुठेही असो ,काम कितीही असो , काही फरक पडत नसतो ह्या तत्वाचे आम्ही दोघे . म्हणूनच ऑगस्ट अखेर

गूढ कथा: "भ्रमभारीत"

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 29/09/2012 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
(१) दुपारचे दोन वाजले. अक्षांश जरा जड डोक्यानेच झोपेतून उठला. आई ने त्याला म्हटले, "चल फ्रेश हो. जेवून घे." अक्षांश कालची नाईट शिफ्ट करून सकाळी सातला घरी आला होता. त्याच्या अंगात काळा टी शर्ट होता, त्यावर "व्हाय'रस'? टेक ज्युस!" असे लिहिलेले होते. कॅब दाराशी सोडून गेल्यानंतर झोपेच्या धुंदीतच तो पायर्‍या चढून वर आला, बेल वाजवताच त्याच्या आईने दार उघडले आणि तो बेडवर आडवा झाला होता. आता दुपारी त्याला आपोआप जाग आली होती. झोपेच्या धुंदीत त्याला आईचे "फ्रेश, जेवण" एवढेच ठळक आणि नीट ऐकू आले. त्याने समोरच्या खिडकीतून पाहिले असता जरा अंधारून आल्याचे त्याला जाणवले.

ते -२

लेखक स्पा यांनी सोमवार, 24/09/2012 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ http://www.misalpav.com/content/%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7 पीसी उघडला. DVD तले फोटो ओपन केले .. सुरुवातीला . समुद्राचे.. टेकड्यांचे, शेतांचे, फोटो होते. सुंदरच साईट आहे .. सातव्या फोटोत ती गढी दिसली आणि मी हादरलोच .. पुढचे सगळे फोटो मी अधाश्यासारखे पहिले .. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .. हो तीच ती गढी..जळलेली. भेसूर. विद्रूप.. गेल्या २५ वर्षांपासून जे अगम्य कोडं स्वतःशी बाळगून होतो ..