पीस
मी प्रवाह कागडिया... सध्या मी एम. एल. ए असल्या मुळे तुम्हाला माझं बोलणं खरं वाटणार नाही. पण काही माणसाचं अजब असतात, जीवनात असल्या व्यक्तीं पेक्षा कितीही जास्त यश प्राप्त केलं, तरी तुम्हाला तुमच सर्व यश बेकार वाटतं आणि त्या व्यक्ति प्रती तुमच आकर्षण किवां कदाचित इर्षा वाढतच असते. माझं बोलणं नाहीना कळाल? जो पर्यंत तुम्ही माझ्या मित्र सुज्ञाला नाही भेटणार, तुम्हाला माझी गोष्ट नाही कळणार...
... आज चौकातून जात असताना, मी माझी 'एस्टीम' गाडी सूज्ञाचा चाळी समोर थांबवली.. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस, दुपारी चारचा सुमार होता.
मिसळपाव