Skip to main content

कथा

राज की समाज....... कारण?(कथा भाग 3 शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 09/12/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------------- दुस-या दिवशी सुगंधा आणि आण्णा साहेब जिल्ह्याच्या गावी जाऊन आले. आण्णांनी खरच काही दुकानातून बोलणी करून दिली आणि लगोलग ऑर्डर्स पण मिळवून दिल्या गोणपाटाच्या पिशव्यांसाठी. आण्णांनी सुगंधाला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखिल नेल. ओळख करून देताना सुगंधाचे वडील आणि पति यांच्याबद्धल देखिल माहिती दिली. आण्णा परतीच्या प्रवासात बरेच खुशीत होते. डाव त्यांच्या मना प्रमाणे साधला होता. सुगंधाला तिच्या संस्थेसाठी ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यामुळे तिचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला होता. मोठ्या नेत्यांना देखिल आण्णांच्या कामगिरीचे कौतुक वाटले होते.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १० )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 07/12/2016 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या खालवत चाललेल्या प्रकृतीच्या आठवणी गुरूनाथ सरावाप्रमाणे रोज सोनचाफ्याची फुलं परडीत जमा करून सुम्याला आणून द्यायचा.त्यातलं एक फुल सरावाप्रमाणे सुम्या आपल्या केसात माळायची.उरलेली फुलं देवाच्या फोटोवर आणि आपल्या गेलेल्या प्रियजनांच्या फोटोवर वहायची.असं करीत असतानाचे ते क्षण तिला मनात येणार्‍या काळजी करणार्‍या विचारापासून दूर ठेवायचे.

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 06/12/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली. उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं. मी देवळात जाणारा नव्हे.

राज की समाज....... कारण?(कथा भाग 2)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 05/12/2016 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
"आठ दिवस झाले तुझी आई देवळात गेली नसेल इतक्या भक्तिभावाने त्या संस्थेत जाते आहे. उदय... हे काही खर नाही पोरा. त्या भवानीला आट्यात घ्यायलाच हवी. पण यावेळी थोड़ वेगळा गेम करावा लागेल. तयारीची दिसती आहे टवळी." दुपारच्या जेवणानंतर आण्णा उदयशी बोलत होते. "उचलु का तिला? ब-याच दिवसात नविन काही नाही पाहिल." उदयने नेहेमीप्रमाणे मुक्ताफळ उधळली. "भाड्या मी काय विचार करतोय आणि तू काय बोलतो आहेस. उदय अरे जरा काम-धंद्याला लाग. पालिकेच्या निवडणुका आठ महिन्यावर आल्यात. गावाच राजकारण आता तू बघायच. मी पंचक्रोशीच बघतो आहे गेली तीन वर्ष. गावसुद्धा मीच सांभाळायच का?

राज की समाज........ कारण?(कथा भाग १)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 03/12/2016 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा साहेब सकाळी दहा वाजल्या पासून त्यांच्या केबिनमधे येरझा-या घालत होते. ते कोणावर तरी प्रचंड चिडले होते. पण कोणावर ते कळायला मार्ग नव्हता. आणि त्या तापल्येल्या राक्षसाच्या समोर जाण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती. सगळेच कार्यकर्ते उदयची वाट बघत होते. उदय म्हणजे आण्णांचा मुलगा. त्याचा उदयच मुळी दुपारी व्हायचा. सवईप्रमाणे साधारण एकच्या सुमारास उदयने कार्यालयात पाऊल ठेवले. "आण्णासाहेब सकाळपासून भडकले आहेत." एकाने तत्परतेने उदयला माहिती दिली.

उतारा (कथा)

लेखक चॅट्सवूड यांनी शनिवार, 03/12/2016 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले" प्रकाश परत तेच म्हणत होता. "अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले. "सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला. सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता. आम्ही दोन दिवस फार्महाउस वर नव्हतो, तेव्हाच दागिने गायब झाले होते. कपाटात दागिन्यांचा डबा नाही ही गोष्ट ज्योतीच्या लक्षात आली. आमच्या लग्नात ज्योतीच्या आजीनेच तो डबा ज्योतीला दिला होता. ज्योती कधीतरीच तो डबा उघडायची.

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २)

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 01/12/2016 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २) सीडीज आवरणे .. एकदम सोपे काम... शात्रीय संगीत एका बाजूला , नाट्यसंगीत वेगळे . पुलं , वपु, शंकर पाटील यांच्या साठी एक वेगळा कोपरा हिंदी गाणी खालच्या कप्प्यात.. त्यातही रफीसाहेबांसाठी वेगळा कोपरा. गझलस वेगळ्या बाजूला ... डोक्यात सगळं पक्क होत.. पटापट आवरू . दोन अडीचशे सीडीज आवरायला कितीसा वेळ लागतो ... ----------------------------------------------------------------------------------------२ धडाक्यात कामाला सुरवात केली. काही पत्ता चुकलेल्या सीडीजना योग्य पत्त्यावर पोचवले ...

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ....

लेखक अमर विश्वास यांनी मंगळवार, 29/11/2016 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे .... शनिवार आणि रविवार हे आम्हा कष्टकरी लोकांच्या दृष्टीने खास दिवस . सोमवार ते शुक्रवार भरपुर कष्ट केल्यानंतर (पुण्यातील ट्रॅफिकमधुन वाट काढत ऑफिसला पोचणे हे मुख्य कष्ट .... ऑफिसमध्ये कामाचे वेगळे .. ) हे सुट्टीचे दोन दिवस म्हणजे जणू संजीवनीच .... तर अशाच एका शनिवार सकाळची ही कहाणी ---------------------------------------------------------------------------------------- शनिवार सकाळ ... जरा आरामातच उठलो. अर्थात मी सूर्यवंशी नाही (सेटमक्सवर सूर्यवंशम पहिल्यापासून हे मी फारच अभिमानाने सांगतो).