“आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत.
“काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या.
“अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत.
“अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका.
“नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय? खी खी खी...”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली.
“हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी!