मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

आनंद - कार्लसन डाव ५

चतुरंग ·
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.

एफर्टलेस मॅगी नूडल्स !

साळसकर ·
६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्‍यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा.

मी त्याला देव मानत नाही…

रामबाण ·
मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी. त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही. असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो... तो_१ छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार. काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची.

आनंद - कार्लसन - डाव २

चतुरंग ·
माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली! असो डावाकडे वळतो. बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे.

आनंद - कार्लसन सामना - डाव १

चतुरंग ·
शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३ आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात! कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे.

देवासाठी काय करावे बरे

देशपांडे विनायक ·
सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ? हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !! हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!! संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !

बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

फारएन्ड ·
२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले.

दि मद्रास टायगर वर्सेस दि मोझार्ट ऑफ चेस

चतुरंग ·
जगातल्या तमाम बुद्धीबळ वेड्यांची दिवाळी यावर्षी सुरु होणार आहे तारीख ९ नोव्हेंबर २०१३, हॉटेल हाएट रीजन्सी, चेन्नैला! 1 ६४ घरांच्या साम्राज्याचं विजेतेपद पाचव्यांदा राखण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या लाडक्या विशीला भिडतोय मॅग्नुस कार्लसन! हा विश्वविजेतेपदाचा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. एकतर हा भारतात होणारा पहिलाच विश्वविजेतेपदाचा सामना आहे.

( चला नांगरूया शेत सारे )

मोदक ·
आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगर