Skip to main content

इतिहास

सावरकरांचे मनोगत

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 10/01/2017 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे - ते मातृभूमी ला उद्देशून हे सांगत आहेत शतदा नकार मज राजमुकुट सोन्याचा, मी तृप्त पाहुनी काळ हा स्वातंत्र्याचा, घेऊन हजारो जन्म तुझ्या उदरातून, मी सदैव राहीन, दास तुझ्या चरणांचा !! प्राणांची देऊन आहुती या यज्ञाला, मी किंचित केले भार कमी खांद्याला, नसता हे जीवन व्यर्थ मानले असते, तुझं कारण आले अर्थ नवे मारण्याला !!
काव्यरस

भारत-तैवान-चीन - एक सुवर्णसंधी

लेखक औरंगजेब यांनी गुरुवार, 05/01/2017 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात ट्रंपने तैवानच्या अध्यक्षाला फोन केल्याची बातमी वाचली. त्यावरुन चिनने केलेला थयथयाट पण पाहिला. खरतर ही भारतासाठी असलेली सुवर्णसंधी आहे. आजपर्यंत तैवान हा चिनचा भाग आहे ही दिलेली मान्यता आपण आता काढुन घ्यायला हवी. तैवानला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणुन मान्यता द्यायला हवी. खरतर चिनचा ग्वादार बंदर आणी एकुणच CPEC योजनेला भारताची ही भुमिका जबर धक्का ठरेल. विशेषतः अमेरिका+ भारत अशा दोघांनीही ही घोषणा केली तर जगाचा याकडे बघायचा द्रुष्टीकोनच बदलेल. आणी ते योग्यच आहे.

जाणता राजा

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 26/12/2016 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा.

काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही, भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 25/12/2016 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही, भाग2 भाग१ (प्रा. शेषराव मोरे ह्यांच्या ‘ काश्मीर एक शापित नंदनवन’ ह्या पुस्तकावरून. इतर संदर्भ – १.Freedom at Midnight- Dominique Lapiere, २. Kashmir- Tragedy of errors- Tavleen Singh, ३. भारतीय मुसलमान – शोध आणि बोध- सेतू माधव राव पगडी, जंग ए काश्मीर- कर्नल शाम चव्हाण) वैधानिक इशारा – लेखातील काही किंवा बरेच मुद्दे तुम्हाला पटणार नाहीत, आवडणार नाहीत पण जे सत्य आहे ते समजून घेणे आणि स्वीकारणे हि समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब असते.

(मुलिंनी धरु नये अबोला)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 25/12/2016 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा

लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 02/12/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
लेडी सीमोर वर्सली या १८व्या शतकातील इंग्लंडच्या नैतिकतेच्या कल्पनांची धूळदाण उडवणाऱ्या बाईबद्दल ऐकून तिला तसंच विसरून जाणं कठीण आहे. तिच्यावरचा अख्खा बीबीसी २ चा 'द स्कँडलस लेडी डब्ल्यू' हा एपिसोड पाहून तर लिहिल्याशिवाय राहवणारच नव्हतं.

न्यूरेम्बर्ग - भाग १

लेखक अफगाण जलेबी यांनी शुक्रवार, 25/11/2016 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग १ न्यूरेम्बर्ग खटल्यांबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते चालवले गेले हीच आहे. दुसरं महायुद्ध हे इतिहासातलं सर्वात संहारक युद्ध होतं. त्याच्या शेवटी विजेते आणि पराभूत हे दोघेही प्रचंड थकलेले होते. युरोपची दुर्दशा झाली होती. जर्मनी जवळपास पूर्णपणे उध्वस्त झाला होता. तिथले बहुसंख्य नागरिक उपासमार आणि रोगराई यांचा सामना करत होते.

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 23/11/2016 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

खादाडी

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 23/11/2016 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय....... घुले साहेबांशी गप्पा मारताना लहानपणी संगमनेरात मिळणारी रामदास नढे कडची ओली भेळ आठवली. शनिवारी नढे काका ओली भेळ द्यायचा नाही, कारण त्याच्या चवीची ओली भेळ बनवायला वेळ लागायचा अन बाजारच्या दिवशी हे चोचले त्याला परवडत नसत.

देवगिरीचे यादव

लेखक आशुतोष-म्हैसेकर यांनी रविवार, 20/11/2016 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
देवगिरीचे यादव संभाजीनगर(औरंगाबाद) म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी.