Skip to main content

इतिहास

बौद्धधर्मप्रसारक... भाग-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/08/2016 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक...

वॉर्स ऑफ द रोजीस-भाग 2

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 05/08/2016 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
राणी मार्गारेटने लँकेस्टरांचा यॉर्कांविरुद्ध पाठिंबा मिळवणं चालू केलं. यापुढच्या अजून मोठ्या प्रमाणावर लढाया झाल्या त्या १४५९मधे. यात मात्र यॉर्कांचा दणदणीत पराभव झाला व रिचर्ड आणि त्याचा मुलगा एडमंड हे आयर्लंडला, तर त्याचा मोठा मुलगा एडवर्ड आणि त्याच्या बायकोचा भाचा अर्ल ऑफ वॉर्विक हे कालाईच्या बंदरात पळून गेले. पण याचा परिणाम अगदीच उलटा झाला. कालाईचा समुद्री किल्ला आता यॉर्कांच्या ताब्यात आला आणि आयर्लंडने रिचर्डला पाठींबा दिला. परिणामी त्यांनी पुन्हा स्वारी करून राणीला राजपुत्रासहीत पळून जाण्यास भाग पाडले.

वॉर्स ऑफ द रोजीस-भाग 1

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 04/08/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
'वॉर्स ऑफ द रोजीस' या अतिशय गुंतागुंतीच्या युद्धमालेबद्दल थोडक्यात माहिती देणं अतिशय कठीण. या 'कझीन्स वॉर'ने इंग्लंडच्या इतिहासात बऱ्याच उलथापालथी घडवल्या. त्याबद्दल शक्य तितकं सुसंगत आणि जमेल तेवढं थोडक्यात माहितीपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. 'वॉर्स ऑफ द रोजीस' म्हणजे 'गुलाबांची युद्धे'. प्लँटाजीनेट वंशाच्या लँकेस्टर व यॉर्क या उपशाखा. लँकेस्टरांचं चिन्ह लाल गुलाब व यॉर्कांचा पांढरा. म्हणून या साधारण १४५५ ते १४८७ दरम्यान झालेल्या दोन घराण्यांमधील युद्धांना अशा नावाने ओळखले जाते. लँकेस्टर इंग्लंडचे राजे होते आणि पाचव्या हेन्रीच्या मृत्यूपर्यंत(१४२२) सगळे बरेच सुरळीत चालले होते.

निर्गुणी भजने‬ (भाग २.७) सुनता है गुरु ग्यानी - समाप्त

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 29/07/2016 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण भजनाचा अर्थ एकत्र लावायचा प्रयत्न केला तर मला हे भजन जीवाची आणि शिवाची भेट कशी घडवावी त्याचे वर्णन वाटते. म्हणून मग जीवाचा सोहं, शिवाचा ओहं आणि या दोघांचा कायम झीनी झीनी वाजत राहणारा बाजा म्हणजे "ओहं सोहं". धृवपदाबद्दल लिहिताना मी याचेच वर्णन, "कायम होत रहाणारा शांत आवाज" असे केले होते. हा जरी कायम चालू असला तरी त्याचे ऐक्य फक्त ज्ञानी साधकाला कळते. आणि मग त्या साधकाचे वर्णन करताना कबीर म्हणतात, सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी | गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी || असा अर्थ मला जास्त सुसंगत वाटतो.

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.६) सुनता है गुरु ग्यानी - चौथा आणि पाचवा चरण

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/07/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनाचा कुंडलिनीच्या प्रवासाशी मी लावलेला संबंध काही वाचकांना, "मारून मुटकून गणपती" बनवण्याचा माझा प्रयत्न वाटला. आणि काहींनी सौम्य शब्दात तशी प्रतिक्रिया देखील दिली. अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ढगांच्या आकारातून प्राणी शोधण्याचा एक प्रकार वाटू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनात कुंडलिनी आणि या भजनाचा संबंध लागण्याचे सगळ्यात मोठे कारण असलेल्या चरणापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. त्यामुळे या दोन चरणांचा अर्थ वाचताना कदाचित माझा सगळा प्रयत्न वायफळाचे मळे फुलवण्याचा नव्हता हे वाचकांना पटेल असे मला वाटते.

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण

लेखक Anand More यांनी बुधवार, 27/07/2016 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे.

बौद्धधर्मप्रसारक... भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 27/07/2016 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
फो बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ धर्मरक्षाबद्दल आपल्याला माहिती मिळते ती त्याच्या चरित्रावरुन. हे चरित्र हे सहाव्या शतकाच्या सुरवातीस लिहिले गेले व अजुनही सेन्गीयु येथे जपून ठेवले आहे. त्याचे नाव आहे ‘‘झु फाहू झुआन’’ म्हणजेच ‘‘धर्मरक्षाचे चरित्र’’.

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण

लेखक Anand More यांनी मंगळवार, 26/07/2016 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता.

बौद्धधर्मप्रसारक...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 25/07/2016 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फो बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा.

निर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहिला चरण

लेखक Anand More यांनी सोमवार, 25/07/2016 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो.