Skip to main content

इतिहास

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

भारताचा एक खरा पण अप्रसिद्ध नायक (अनसंग हिरो) : माथुन्नी मॅथ्यूज

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 21/05/2017 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता, जगावेगळे धैर्य दाखवून, आपल्याशी तसा काही तडक संबंध नसलेल्या लोकांना वाचविण्यासाठी असामान्य कार्य करतात. अश्या माणसांना बर्‍याचदा पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि थोडीबहूत मिळाली तरी, यातली बरीच माणसे प्रसिद्धिपराङमुख असल्याने, जनतेच्या आठवणीतून सहज निघून जातात. मात्र, अशी माणसे खर्‍या अर्थाने नायक (हिरो) असतात. असाच एक, मुथुन्नी मॅथ्युज नावाचा, भारतिय सुपुत्र आणि नायक काल (२० मे २०१७ रोजी) आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. आज हे नाव कोणाला सहजपणे आठवणार नाही.

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 19/05/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.

(ही पहा पाडली गजल)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 16/05/2017 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले पेरणा सांगायलाच पाहिजे का? ही पहा पाडली गजल, ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी, उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू, शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी, कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली, रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी, हो!

श्री निनाद बेडेकर व्याख्यान - छत्रपती शिवाजी महाराज

लेखक हेमंत लाटकर यांनी रविवार, 14/05/2017 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
१) शिवचरित्राचे महत्व http://youtu.be/X06uY6YZ8zo २) छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वधर्म http://youtu.be/YTCTsEISQTk ३) छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म http://youtu.be/Jfj9uZv5D5A ४) छत्रपती शिवाजी महाराजांचे रणसंग्राम http://youtu.be/rkepjnpwFHI ५) छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्री http://youtu.be/hFzQ7TvSgVU ६) छत्रपती शिवाजी महाराज आणि समुद्र व आरमार

बिडी जलायले.....: नाशिकचा उद्योग ०६

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 11/05/2017 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
( उत्तरार्ध ) : नाशिकच्या आर्थिक आणि सामाजिक बदलाबरोबर नाशिकचा भूगोल बदलायची ही सुरुवात होती. कारण पारंपरिक किंवा जाती किंवा वर्ण व्यवस्थेवर आधारित करण्याच्याच्या व्यवस्थेला नाशिकपुरते तरी बिडी व्यवसायानेच एका अर्थाने सुरुंग लावला. विशेषतः बहुजन समाजातल्या विशेषतः मागास जातीतील कुटुंबाना त्यांच्या पारंपरिक व्यवसायाव्यतिरिक्त पैसे मिळवण्याची पहिली संधी बिडी उद्योगानेच दिली ही एका अत्यंत महत्वाच्या स्थित्यंतराची सुरुवात होती. आपापली कामे झाल्यावर उरलेल्या वेळात सुरुवातीला बिडीच्या कारखान्यात जाऊन काम करण्याची संधी विशेषतः बहुजन समाजाच्या लोकांना मिळत असे.

बिडी: नाशिक उद्योग - ०५ : बिडीने "वळवले" नाशिकचे अर्थकारण

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 07/05/2017 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ती १९/२० वर्षाची असेल. साल सुमारे १९८०. काशा तिचा धाकटा भाऊ. मी अन काशा घट्ट मित्र. शाळेतले. त्यावेळी आम्ही पाचवीत. खेळायला आम्ही एकमेकांच्या घरी किंवा गल्लीत पडीक. काशाची आक्का (ताई) मला किती तरी वर्षे राखी बांधायची. आमची तिघांची घट्ट गट्टी. आक्काचं लग्न चारच महिन्यापूर्वी करंडीच्या जल्लोषात झालं होतं. करंडी हे आमच्या निपाणीचे खास वाद्य. लग्नानंतर चारच महिन्यांनी त्यादिवशी कामगार वस्तीतल्या त्यांच्या एक खोलीच्या घरात जोरात रडारड.कल्ला. आक्की रडत होती. आई मोठ्यानं शिव्या देत रडत होती. आबा ओरडून समजावत होता. मला एवढंच आज नक्की आठवतं, आक्की शेवटी ओरडून म्हणाली होती "....

न्यूरेम्बर्ग - भाग ३

लेखक अफगाण जलेबी यांनी सोमवार, 01/05/2017 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग २ न्यूरेम्बर्ग - भाग ३ २० नोव्हेंबर १९४५ या दिवशी खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधी अनेक पडद्यामागच्या घडामोडी घडल्या. खटला सुरु होण्याच्या साधारण एक आठवडा आधी रशियन सरकारी वकील रुदेन्कोला मलेरिया झाल्याचा निरोप न्यायाधीशांना मिळाला. ब्रिटिश आणि अमेरिकन वकिलांचा आणि न्यायाधीशांचा अर्थातच याच्यावर विश्वास बसला नाही. ‘ हा राजनैतिक मलेरिया असावा ‘ असं मत ब्रिटिश परराष्ट्र खात्याने व्यक्त केलं. दुसरीकडे सर्व आरोपींच्या वकिलांनी या न्यायालयाच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका दाखल केली.

०४ नाशिकचे घड्याळजी - नाशिकचा उद्योग

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 28/04/2017 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्यांस घड्याळाचे भलते वेड. १७३४ साली बाजीराव पेशव्यांनी खरीदलेले घड्याळ १७३५ सालात एका कॅप्टन वॉकर नामक इंग्रजाने दुरुस्त केले असा उल्लेख असलेले कॅप्टनने बाजीरावास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. म्हणजे बाजीराव घड्याळ वापरत होते. गंगापूरला राहणाऱ्या माधवरावच्या आई गोपिकाबाईस ठराविक घडीला जप आणि ध्यान करता यावे म्हणून खास तीन रुपये किमतीचे वाळूचे घड्याळ - वालुकायंत्र - दिले होते. माधवरावाचे धाकटे बंधू नारायणरावकडे चक्क हातघड्याळ होते, ते तो मिरवीत असे. हातघड्याळ इतकी दुर्मिळ चीज होती की नारायणराव बडेजावीने वापरीत.