Skip to main content

इतिहास

मक्केतील उठाव ५

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 17/10/2016 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग ४ उलेमा मंडळींनी सौदी सरकारला प्रतिहल्ला करायची परवानगी दिली खरी पण त्याकरता कुराणामधील एका परिच्छेदाचा संदर्भ त्यांनी वापरला त्यात असे म्हटले होते की "त्या पवित्र मशिदीत लढाई करू नका जोवर ते तुमच्याशी लढत नाहीत, पण त्यांनी सुरवात केली तर मात्र तुम्ही त्यांना सोडू नका, अश्रद्ध लोकांना असेच शासन मिळते." आता इथे असे सुचवले आहे की मशिदीत उपस्थित अतिरेकी हे अश्रद्ध असले पाहिजेत. आता ह्या अतिरेकी लोकांना अश्रद्ध, धर्मभ्रष्ट ठरवणे हे मोठेच आव्हान होते. कारण त्यांचे अतिरेकी धार्मिकपण सगळ्यांना व्यवस्थित माहीत होते.

मक्केतील उठाव ४

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 15/10/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग ३ मशिदीचा नकाशा सौदी अरेबियाच्या वेळेनुसार बुधवारी (२१ नोव्हेंबर १९७९) रात्री उशिरा दळणवळण बंदी (अर्थात कम्युनिकेशन ब्लॅकआउट) उठवण्यात आली. मग थोडी फार खरी हकीकत लोकांच्या कानावर येऊ लागली. सौदी अरेबियाचे राज्यकर्ते ह्या नात्याने सौदी राजघराणे हे इस्लामच्या सर्वात पवित्र स्थळाचे विश्वस्त बनलेले आहेत. त्यातून त्यांना प्रत्येक वर्षी अब्जावधी डॉलर्स महसूल मिळतो.

शिवरायांचा कालचा दसरा

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 12/10/2016 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज घुमत होता. तिथे गेले नऊ दिवस देवीचा जागर चालू होता. शारदीय नवरात्रीचे दिवस. दशमीचा चांदवा

मक्केतील उठाव ३

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 10/10/2016 05:28 या दिवशी प्रकाशित केले.
मक्केतील उठाव १ मक्केतील उठाव २ २० नोव्हेंबरला मक्केचा ताबा अतिरेक्यांनी घेतला. पण सौदी सरकारने फार काही प्रतिकार केला नाही. त्यांचे सगळे उच्चपदस्थ राजपुत्र ट्युनिशिया, मोरक्को अशा जागी कुठल्याशा बैठकांकरता वा सुट्टीकरता गेलेले होते. सौदी राजा म्हातारा होता. काही ना काही तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रासलेला होता. हळूहळू एक दोन दिवसांनी गृहमंत्री, सुरक्षामंत्री अशी पदे संभाळणारे लोक एकदाचे सौदी अरेबियात दाखल झाले.

मोसाद - भाग १३

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 07/10/2016 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १२ मोसाद - भाग १३ ५ ऑक्टोबर १९७३, लंडन. ‘ डुबी ’ हे टोपणनाव असणाऱ्या एका मोसाद एजंटला इजिप्तची राजधानी कैरोमधून रात्री दीड वाजता एक कॉल आला. इझराईलच्या लंडनमधल्या वकिलातीशिवाय मोसादच्या मालकीची लंडनमध्ये अनेक घरं होती. त्यातल्या एका ‘ सुरक्षित घर ’ किंवा सेफ हाऊसमधून डुबी आपलं काम करत असे. इथे असलेल्या फोनचा नंबर फारच कमी जणांना माहित होता आणि तिथे नेहमी सकाळी किंवा दुपारीच फोन येत असत. त्यामुळे रात्री दीड वाजता फोन येणं हीच अनपेक्षित गोष्ट होती. डुबीने फोन उचलला. पलीकडून कोण बोलतंय हे कळल्यावर त्याची उरलेली झोप उडाली.

मक्केतील उठाव २

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 02/10/2016 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग इस्लाम स्थापन झाल्यापासून किंबहुना त्याआधीही मक्का हे शहर हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. प्रत्येक मुसलमानाला अशी धर्माज्ञा असते की आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करावी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक मुस्लिम आयुष्यात एकदा तरी ही तीर्थयात्रा करतोच. सौदी अरेबियाकरता मक्का हे एक प्रतिष्ठेचे स्थान आहे. जगभरातील मुस्लिमांनी पवित्र मानलेल्या जागेची व्यवस्था बघण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्याचे पावित्र्य टिकवणे हे त्यांचे ते कर्तव्य मानतात. अर्थात ह्या यात्रेमुळे सौदी सरकारला मोठा महसूलही मिळतो.

बौद्धधर्मप्रसारक... भाग-६ शेवटचा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/09/2016 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक... भाग-२ बौद्धधर्मप्रसारक... भाग-३ बौद्धधर्मप्रसारक...

मनाचा एकांत - काळे पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 30/09/2016 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

पावन

लेखक निओ यांनी गुरुवार, 29/09/2016 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली होती. आभाळ सर्वदूर व्यापून होते. रप् रप् पाऊस झाडा झुडुपात, चिखलात वाजत होता. घोडखिंडीतील पाणी आता लाल होऊन वाहत होतं. वरनं पावसानं आणि खालनं मावळ्यांनी घोडखिंडीत झुंबड उडवली होती. तलवारींच्या खण् खणाटांनी आणि आरोळ्यांनी खिंड दणाणून गेली होती. हबशी सिद्दी मसूद आणि त्याची रानटी फौज पुढे घुसायचा प्रयत्न करीत होती. बांदलसेना हर प्रकारे तो हाणून पाडत होती. मराठयांच्या राजाचा जीव धोक्यात होता. तो वाचवण्यासाठी मावळे पराक्रमाची शर्थ करत होते तर आपल्या सरदाराची अब्रू वाचवण्यासाठी मसूदची फौज झगडत होती. हिरडस मावळातील बांदलसेना जीवावर उदार होऊन लढत होती.

मक्केतील उठाव १

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 25/09/2016 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला. त्याचे परिणाम सगळ्या जगावर झाले. तेव्हापासून अमेरिकेत एक वाक्प्रचार बनला आहे अमुक देशाचे ९/११. जसे २६/११ चा मुंबईवरील हल्ला हा भारताचे ९/११, स्पेनमध्ये माद्रिद येथे रेल्वे गाड्यांमध्ये अनेक स्फोट होऊन शेकडो लोक मेले त्याला स्पेनचे ९/११ म्हटले जाते. हाच नियम लावला तर मक्केतील १९७९ साली झालेला उठाव ह्याला सौदी अरेबियाचे ९/११ म्हणता येईल. ह्या घटनेने सौदी राजघराणे मुळापासून हादरले. बंडखोरांचा क्रूरपणे बिमोड केलाच. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी आपली धोरणे पूर्णपणे बदलली.