Skip to main content

इंदुरी

बोटावर शाईचा अजून रंग ओला

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 17/11/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
बोटावर शाईचा अजून रंग ओला माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला विश्वासून तुझीयावर मते तूला दिली राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला पैजारबुवा,

(दुपारी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 18/09/2019 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात चाल :- बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा) ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा, तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले" ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी" ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके" आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 04/06/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय " अय साला " करून, डिट्टो करतो हाणामारी स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी बिग बी ची ऍक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय शहेनशहा बनुन बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री चमकणारा हात बघून लागली भरपूर मागे कुत्री लटपट लटपट धावत होतो जणू अग्निपथावरती जंजीर धरुनी दिवार चढलो मग पडलो तोंडावरती तोंड फुटुनी पार सुजले , आला गळ्यात माझ्या पाय मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण काय करू , आता पाय गळ्यात आलाय भाय नायतर नक्की बनलो असतो बि

(दाराआडची आई)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

(दाराआडचा मुलगा)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 04/04/2019 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा एक मुलगा दाराआडून चोरून चोरून बघतो आहे बाहेर किती बाहेर? बाथरुमच्या बाहेर, खोलीमधे जिथे त्याची मैत्रीण बसली आहे मोबाईल वर गेम खेळत त्याचीच वाट बघत, करत असेल का ती ही तिकडून जाण्याचा विचार? समजले असेल का तिलाही तो चोरून तिच्या कडे बघतो आहे, तिच्या जाण्याची वाट बघत ? मुलगा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... कारण तो टॉवेल आणि कपडे खोलीत विसरला आहे, ते नेमके त्या मुलीच्याच शेजारी पडलेले आहेत, मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते.... टॉवेल विसरलेला मुलगा बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो... हताशपणे वाट बघतच राहत

(पाहिजे)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2019 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा हे पाहिले आणि म्हटले आपणही जाहिरात देउनच टाकावी. ऑफिस मध्ये कामा साठी कष्टाळू मुलगा पाहिजे त्याच्या कडे स्वत:चे दुचाकी वहान असले पाहिजे गाईच्या धारा काढण्यासाठी हवा एक अनुभवी गडी गायीच्या लाथा गोड मानण्याची त्याची तयारी पाहिजे घरकामासाठी हवी आहे एक मोलकरीण घरात पडेल ते काम तिने केले पाहिजे शेतात काम करण्यासाठी मजूर हवे आहेत उन पाउस चिखलात राबण्याची त्यांची तयारी पाहिजे तसेच एक माळी, फिटर, प्लंबर, सुतार व गवंडी तसेच, हापिसात कामाला एक अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे वारजे किंवा सिंहगड रोड परिसरात १ किं

बातम्या बघणे हे निमित्तमात्र..

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 29/03/2019 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमाला तर तीन तीन पेर्ना येक दो और तीन मग पुढे असं होतं की .. शब्दा शब्दांनी वाद वाढत जातात.. डोळ्यामधले निर्झर वाहू लागतात... ओठांमधून सुस्कारे सुटू लागतात ... उखाळ्या पाखाळ्या सुरु होतात .. आणि मागचे शिल्लक हिशोब लागतात उलगडायला.. मी म्हणूनच कसे सोसते ते दोन्ही बाजूनी येउ लागते ऐकायला.. आपण मात्र, आई आणि बायकोच्या मध्ये सापडू नये म्हणून गप्प बसायचं.. बातम्या बघणे हे निमित्तमात्र.. (अनुभवी) पैजारबुवा,

(खुरपणी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 29/12/2017 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा खुरपणी संयम संपला संतापाने, फुलला माझा श्वास लागलात जर मागे माझ्या, घेइन मिपा संन्यास ||१ || इक्षुदंडी कविता लिहिता, धावत येती टवाळ प्रतिसादांच्या उतरंडीने, मन होते किती घायाळ ||२ || पान खाऊन येती दाजीबा पिंकाच्या टाकीत चुळा, चार शब्दही कौतुकाचे लिहीले न माझ्या भाळा ||३ || एकएक प्रतिसाद वाचून माझे अंगअंग शहारले श्वास होतो विग्दद, हे माझे विश्वची न उरले |||४ || प्रतिसादांनी तुमच्या राया स्वत्व माझे हरवले कॅलेंडरी कविता करता माझे भान हरपले ||५ || असेल तुमची प्रीती म्हणूनी, कितीदा दुर्लक्ष मी क

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.