मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते

विशाल कुलकर्णी ·
कां रक्त साचलेले पदरात लाल होते? गर्भात कोंडलेले मौनी सवाल होते जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते तुम्ही परंपरांची मिरवाल कौतुकेही उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते रस्त्यात सांडल्या अन मातीस प्राप्त झाल्या भाळावरी कळ्यांच्या कुठले गुलाल होते? येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे हतबुद्ध शायराचे फसले खयाल होते © विशाल कुलकर्णी

तुझ्या नाजूक ओठांनी...

सत्यजित... ·
अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी! फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी!

सलगीराह मुबारक हो गुलाम अली साहब

स्वलिखित ·
गुलाम अली साहब... सालगीराह मुबारक हो , तुमच्या बद्दल सर्व काही माहित असूनही काय लिहावं हेच कळत नाही, कारण तुम्हाला आजपर्यंत जे काही ओळखले ते फक्त संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये..

जपमाळ

शैलेन्द्र ·
हेही बरेच आहे, तेही बरेच होते, आपापल्या परीने, सारे खरेच होते मोजून पाप माझे जपमाळ ओवलेली, मोक्षास गाठण्याला, तितके पुरेचं होते, आयुष्य तारकांचे मोजीत रात्र होती मोहक असे मनाला भूलवीत बरेच होते खाणीत नांदण्याचा कोळश्यास शाप आहे नसते ठिसूळ तुकडे तर तेही हिरेच होते सरणास भेटताना गेली नजर मागे चेहरे ओळखीचे हसरे सारेच होते -शैलेंद्र

मनातल्या मनात मी...

सत्यजित... ·
मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे! तुटून तारका क्षणात आसमंत लांघते उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे! गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

नवीन आहे

आगाऊ म्हादया...... ·
एक गझल लिहिण्याचा प्रयत्न आहे. जाणकारांनी जरूर मार्गदर्शन करावे. विशेष सूचना- हौशे, नवशे, गवशे ह्यांनी दूर राहावे ( हे मिपावर कमी मात्र झुक्या फॅमिलीत विपुल आहेत) व आपापल्या मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी "मी चंद्र आणेल किंवा का गं सोडून गेलीस मला, एकटे टाकून गेलीस मला " ह्या प्रकारातील काव्य वापरावे जे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

मेरे हर दर्द को मेहसूस किया है मैंने.. ..

Swapnaa ·
ग़ज़ल मेरे हर दर्द को मेहसूस किया है मैंने, ना पूछ कीसीको क़्या पाया हे मैंने मेरे इतनि सी हँसी को झूठा नक़ाब पहनाया हे मैंने, ना समज कहीं गवाया है मैंने मेरे चंद अश्कों का सौदा करलिया है मैंने, तन्हाई में जीना सीख लिया है मैंने मेरे टूटें भरोसें के कातिल को जाना है मैंने, उफ़ तक करना भुला दिया है मैंने मेरे हिस्सें की छाँव छोड़ दी है मैंने, धुप के थपेड़ों कों पीना शुरू किया है मैंने मेरे ख़यालों की नैया जबसे ठानी है मैंने, कलम के सहारें चलते रेहना है मैंने मेरे हौंसलें कों बुलंद किया है मैंने, गिर के भी फिर से ख़ुद को संभाला है मैंने कवी - स्वप्ना

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित... ·
हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे... सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे? अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे? किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे! बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू... विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे! उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे! नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे! मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते... असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे! —सत्यजित

मी माझे तारांगण सादर करतो

drsunilahirrao ·
कोण कुठे कोणाचा आदर करतो पाठीवरती वार बिरादर करतो प्याद्याला आदेश रणाचा देतो नि तिथुनी घुमजाव बहादर करतो गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर देवाचे रक्षण जमगादर करतो तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी मी अवघ्या देहाची चादर करतो आळ नको घेऊ, झाडाझडती घे (मी माझे तारांगण सादर करतो) देव दयाळू आहे कळल्यापासुन रोज नवे कन्फेशन फादर करतो डॉ. सुनील अहिरराव

मेंदुला दुखापत

रानरेडा ·
मेंदुला दुखापत पाशवी गवत आहे पाशवी गवत आहे खेळ आणि डेझी चेन आणि हसणे स्मरण पथ्यावर ल्यूनी ठेवण्यासाठी आला पापी हॉलमध्ये आहे पार्सर्स माझ्या हॉलमध्ये आहेत या कागदाच्या चौकटीत चेहर्यावर जमिनीवर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी पेपर बॉय अधिक आणतो आणि जर बांध काही वर्षांनी खुले होते आणि जर टेकडीवर काहीच जागा नसेल आणि जर आपले डोकेदेखील अंधाऱ्या विरहीत असतील तर मी तुम्हाला चंद्राच्या गडद बाजूला बघितो पागल माझ्या डोक्यात आहे पागल माझ्या डोक्यात आहे आपण ब्लेड लावा, आपण बदल करा मी पुन्हा विचार करेन 'जोपर्यंत मी समजणार नाही आपण दार लॉक आणि कळ टाकून द्या माझ्या डोक्यात कोणीतरी आहे पण मी नाही आहे जर मेघगर