(भणंग २)
सकाळी सकाळी चमत्कारी ह्यांची 'भणंग २' ही गजल वाचून आमच्या मनात विचारांची गर्दी झाली आणि हे लगोलग हे विडंबन बाहेर पडले! ;)
उषःपान झाले सकाळी सकाळी
तुला 'छान' झाले सकाळी सकाळी
चवीला बिडी मस्त ओठात घेता
'धुरापान' झाले सकाळी सकाळी
'तिथे' पोचता पाहिले एकमेका
कसे ध्यान झाले सकाळी सकाळी
जरा 'वेग' आल्यावरी लोक सारे
गतीमान झाले सकाळी सकाळी
इसबगोल सर्वास उ:शाप झाला
बक:ध्यान झाले सकाळी सकाळी
म्हणालाच 'रंगा', तरी शेवटाला
समाधान झाले सकाळी सकाळी
चतुरंग
याद्या
1654
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहाहा
मस्त मस्त