Skip to main content

(कहर)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/08/2008 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! ;) टंच आहे टंकणारी बांधणीला ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला आडलो नाही तसा मी बोलताना आडला येऊन हुद्दा ऐरणीला काय सांगू कहर हा झाला कशाने का पुढे बसवून गेली ढापणीला? ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर बोलवी साहेब कसल्या चाचणीला? ते भले मोठे नको रोखूस डोळे संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे मार खाण्याची अखेरी वळचणीला चतुरंग

(नूर)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/08/2008 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला! दारावरुन गेली, पाहून हूर आलो आता इथेच होती, शोधीत दूर आलो! जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी (पाहून तेथला मी आनंद-पूर आलो) ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो... 'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण- भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो चतुरंग

रिता गाभारा .....

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 01/08/2008 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
देहात माझीया हा चंद्र वितळून गेला । अन अंतरी मोगराही सुगंध मिसळून गेला । झुकवुनी लाख पाहिले नजरेस मी माझीया । तीर तुझ्या नजरेचा काळजास वेधून गेला । बेरंगी दुनियेचा ना कायदा मी मोडला । इशाराच एक तुझा मज हाय रंगवून गेला । वेचियेली मी दुःखेही माझ्या दोहो करांनी। फासा दुर्दैवाचा मज दान देऊन गेला । ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । गर्दीत अनोळख्यांच्या मज मैत्र एक भेटला । जीवलगच तो जीवाचा मग घाव घालून गेला । लाविले कसास माझ्या मी प्रत्येक श्वासाला । क्षणाक्षणांनी काळही मजला परखून गेला । शोधियले त्रिखंडात मी त्याच सर्वेश्वराला । -हुदयीचा गाभारा प

(बेचैन)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/07/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची सुंदर गजल'चैन' आम्हाला चांगलीच हलवून गेली आणि आम्ही बेचैन झालो!;) गजल वाचुन हालतो 'वरचाच मजला' काय मी आता करु?

चैन

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी बुधवार, 30/07/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द हल्ली सारखे छळतात मजला आणि ओळी चार मग सुचतात मजला बोलली नाहीस तू काही तरीपण अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला चांदण्यांना रोजची का रात्रपाळी? प्रश्न हे आता असे पडतात मजला कायदे काही शहाण्यांचे असू द्या फायदे वेडात हे दिसतात मजला मी भरवसा माणसांचा काय द्यावा? सावल्याही जर अशा गिळतात मजला देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला

ठपका!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 26/07/2008 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
'ठिपका' ही सुंदर गजल घेऊन आलेल्या अनिरुद्ध अभ्यंकरांच्या वेशातल्या केशवसुमारांना आम्ही ओळखले मात्र पाठोपाठ विडंबनधर्माला जागणे आले! ;) ठपका!

ठिपका

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शुक्रवार, 25/07/2008 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
घडायचे ते घडले काही टळले नाही त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही कळले नाही कसा कधी संवाद संपला वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही आज अचानक अर्थ असा हा समोर आला त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही मान्य कधीही केले नाही आपण चुकलो दोघांमधले अंतर मग हे घटले नाही बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही तू जाताना नजर तुझी माघारी वळली का माघारी पाय तुझे पण वळले नाही? बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही -अनि

(माउस)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 24/07/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..! झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..! मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला, मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..! कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला. रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..! अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा, कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा

पाउस..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 24/07/2008 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला. तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..! कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला. मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..! अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली. रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..! कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

(निवृत्ती)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/07/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवस गावाला गेलो होतो येऊन बघतो तो काय निवृत्ती? गुरुवर्य केशवसुमारांच्या ह्या'निवृत्ती'ने आमच्या भावना उचंबळून आल्या. घेतला वसा टाकणे ही तर विडंबनाशी प्रतारणाच, शिवाय गुरुवर्यांना काय वाटेल?