Skip to main content

(आनंदाने)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 08/10/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;) पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने... शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने... जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... चतुरंग
Taxonomy upgrade extras

(अफवा)

लेखक चतुरंग यांनी रविवार, 28/09/2008 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसाद कुलकर्णींच्या 'अफवा' वाचून आमच्या पूर्वीच्या काही प्रमादांबद्द्ल उठलेल्या अफवांची आठवण ताजी झाली!

(खायचे आहे कुठे?)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 19/09/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल! काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे? चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?... ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?... दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो?

जाम कोणी देइ

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 18/09/2008 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
******************** * जाम कोणी देइ अव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये * खाक जाळे दु:ख मोठे थेंबही एकही थेंबा कधी सांडू नये * भेटता तू स्वर्ग भेटे या इथे या क्षणाला दृष्ट मी लावू नये * काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये * घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये * वेगळी काही नशा होते जया जाहिदाचे नाव त्या देऊ नये * ********************
Taxonomy upgrade extras

(टाळतो)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 16/09/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
केदार पाटणकर ह्यांचे 'टाळणे' बघून आम्हाला आमची वारंवार चालणारी टाळाटाळी आठवली! ;) रोजचा छळवाद आता टाळतो मी जरा व्यायाम आता टाळतो पाहिजे आहे तनाला शांतता कोणतीही चाल आता टाळतो गोड 'केका'ची खुमारी आगळी वरण-भाता हळुच आता टाळतो सोडले पळणे, तरण केव्हाच मी 'जीम'चीही वाट आता टाळतो घेर ढेरीचा कितीही वाढला घोरण्याचे मी न आता टाळतो! चतुरंग

वाटले की शेवटी होकार झाला

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 16/09/2008 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
****************** वाटले की शेवटी होकार झाला - का विचारे मी पुन्हा इन्कार झाला? *** जो कवी आनंद होता वांझ होता घात होता तो बघा फनकार झाला! *** ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला. *** काल रात्री काजव्याला देखिले ज्या काळरात्री तो जणू अंगार झाला. *** धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला. *** होत गेला हो जयाला पारखा जो होउनी आराध्य तो साकार झाला. ******************
-धनंजय (सप्टेंबर १५, २००८)
Taxonomy upgrade extras

निरर्थक...

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 13/09/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकांत सोसवे ना.. प्रेमात अर्थ कसला? प्रेमास घाबरे त्या.. हृदयांत अर्थ कसला? साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? रण थोडके नसे परि पेटे पराक्रमाने.. पण आपुला न झाला.. विजयांत अर्थ कसला? बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी.. बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? क्रांती मशाल घेवुन मेले स्वतः परंतू... कोणीच आठवे ना.. मरण्यांत अर्थ कसला? वाहून काळजातुन तृष्णा अनेक मिटल्या... पण... बांध घातले तर... झरण्यात अर्थ कसला? मांडू नका समोरी पेले असे रिकामे... भरणे नसे इथे तर.. जमण्यांत अर्थ कसला? मेलेच पाहिजे मी वाटू नये परंतू... मरतो हरेक क्षण तर...

(...बोकडाचे खूर काही!)

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 06/09/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींचे 'मारव्याचे सूर काही' ऐकले आणि एका वेगळ्याच रागाचे चित्र नजरेसमोरुन तरळले! ;) मारले वजनास, स्नायू फुगवले भरपूर काही! जवळ येतानाच गेले, ढेर माझे दूर काही! मी जरी कुथलो कितीही जोर ते मारायला पण.... होत नाही 'बेडकी'चा सांड तो मगरूर काही! ओरडा कोणी कितीही - बाटल्या होती रिकाम्या तोंड अमुचे सोडते मग दाटलेला धूर काही! वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू 'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही ! रोज मी एकेक पळुनी फाडतो प्यांटीस माझ्या... आरसा मग दोंद माझे दाखवी भेसूर काही!

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

लेखक मनिष यांनी बुधवार, 27/08/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता.

(पहा वेळ झाली!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/08/2008 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! :SS :T पहा 'वेळ' झाली! 'ठमा' क्रूर आली! पळे भीत 'रिंकू'; लपेटून शाली. करा बंद गाणी; कुठे ती पळाली? बिछान्यात माती बुटांची मिळाली. कशी ही विचारे; सदर्‍यास लाली? मिळे चोप 'रंग्या'; घरी कोतवाली! चतुरंग