Skip to main content

प्रबंध

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 25/07/2014 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा येऊनिया न यावा माझा प्रयास कामी नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा - अपूर्व ओक
काव्यरस

बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 11/07/2014 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक उदासीचा महौल, बहादुरशा जफ़रचा सिद्धहस्त कलाम, आणि मेहदी हसन साहेबांची पेशकश! नकोनकोशी वाटणारी उदासी देखिल किती कलात्मकपणे मांडता येते, याची कमाल म्हणजे ही ग़ज़ल. पावसाळी कुंद हवेत या ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला, आपण नि:शब्द होऊन जातो! संदीप म्हणतो : बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो, कशी शांतता शून्य, शब्दात येते. आताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते । ती शून्य शांतता, तो असहाय्यतेचा, बेकसीचा रंग, बोलणं मुश्कील झालं असतांना, ते शब्दात उतरवणं, ही उस्ताद बहादुरशा ज़फ़रची कमाल.

"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 01/07/2014 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक : ०१-०७-२०१४

"माझी गझल निराळी" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

शायरी - भाग २

लेखक चिनार यांनी सोमवार, 30/06/2014 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
मेरी जिंदगी मे तेरा वजूद कुछ ऐसा है, , के तू नही तो मेरा कोई वजूद नही ! तुझे पाने के ख्वाईश कुछ ऐसी है, , के तू नही तो कोई और ख्वाईश नही ! ! यू तो अकेला ही चला था मै एक राह पर , , हां ! ,तेरे मिलने से राहत मिली अब तेरे ना होने का गम तो नही, , पर सामने देखता हू तो कोई मंजिल भी नही ! ! एक और दिन बीत गया तेरे खयाल मे , एक और शाम ढल गयी तेरी याद मे , अब इस रात से डरता हू , कही ये भी ना गुजर जाये तेरे इन्तेजार मे ! ! एक दिन ,एक शाम, एक रात तो बीत जायेगी , कही सांस न रुक जाये तेरे इन्तेजार मे ! !
काव्यरस

शायरी ...

लेखक चिनार यांनी सोमवार, 23/06/2014 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
१. तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे , के तुझे धून्डते धून्डते मैने खुदको खो दिया ! और जब खुदको धून्डने निकला, , तो हर जगह सिर्फ तेरा चेहरा नजर आया ! ! २. तेरी आखो में खोकर कई ख्वाब देख लीये मैने , तेरी सांसो में मिलकर एक जिंदगी जी ली मैने , अब ना तेरी आखे है , ना तेरी सांसे है, , ना कोई ख्वाब है ,, बस्स एक जिंदगी है…. जो पिछा नही छोडती ! ! ३.तेरा ना मिलना तनहाई से क्या कम था , के अब जीने से मै घबराऊ ? तनहा जिंदगी नरक से क्या कम थी , के अब मरने से मै घबराऊ ??

मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 22/06/2014 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
उस्ताद क़मर जलालवींची ही दिलकश ग़ज़ल, ग़ुलाम अलींनी यमनच्या माहौलमधे जी काय बेहद्द रंगवली आहे ती पुन्हा पुन्हा ऐकण्याजोगी आहे. इश्काचा बिमार तिचीच कहाणी अखेरपर्यंत गात राहिला.

मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी गुरुवार, 12/06/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 ----- आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले , माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले , माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 -------- तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 -------- काही करू पहाता विपरीत होत आहे , माझे मला न उमगे
काव्यरस

अस्थी कृषीवलांच्या

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 12/06/2014 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

तू मला वगळून उरणे शक्य नाही

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 24/05/2014 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
तू कुणावर प्रेम करणे शक्य नाही जन्मभर वणव्यात जळणे शक्य नाही तू सुखाच्या सोबतीने चाल राणी मी दगा दुःखास देणे शक्य नाही हे तुझे आंगण तुला लखलाभ आता ते पुन्हा केव्हा बहरणे शक्य नाही जीवना, हा छान बंदीवास आहे जो उभ्या जन्मात सरणे शक्य नाही मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही .. तू कितीही बांध भिंती अस्मितेच्या तू मला वगळून उरणे शक्य नाही डॉ.सुनील अहिरराव

पराचा पारवा होतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 05/05/2014 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
किती हे शांत होते गाव ,जेव्हा मी नवा होतो अता भेटीस मी आलो तुझ्या की गवगवा होतो किती गावे इथे सूरात मी, पण दाद ना मिळते किती केलास तू कल्ला तरीही वाहवा होतो इशार्यावर इशारे ते कुणाचे सांगना होते जरा मी हात धरला तर पराचा पारवा होतो तुझ्यामाझ्यातला हा वाद आता सोडवावा तू - जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो अता कळते, कशासाठी मला तू टाळले तेव्हा .. तुला मी नेहमीसाठी तुझ्याजवळी हवा होतो डॉ.सुनील अहिरराव