Skip to main content

एवढासा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भानावरी आज आलो जरासा माझाच मी भासलो एवढासा समजावुनी या मनाला पुन्हा मी दिधला नव्या कल्पनेला दिलासा रडू कधीचे स्मरून हसलो आणि टाकला भावनेने उसासा जशी रात्र आणि दिवस हा जसा कधी मी नकोसा कधी मी हवासा नको दूर शोधू सुखाला अपूर्व खेळच मुळी हा असे एवढासा २४-४-१३ १८:०१
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1105
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कविता आवडली. ही गझल आहे का? मला त्यातला फरक सांगता येणार नाही. पण पहिल्या ४ ओळीत जे वृत्त आहे, पुढच्या ओळींमधे कल्पना आवडली तरी शब्द त्याच वृत्तात वाटले नाहीत, केवळ एवढ्यासाठीच विचारते आहे.