ओ.सी.डी. म्हणजे ऑबसेसीव कंपल्सीव डीसऑर्डर. आता ह्याला समांतर मराठी शब्द मला माहीत नाही. पापड,लोणचे, मुरंबा ह्यानी तो द्यावा.
_______________________________________________________
अहो ब्रश आणला आहे ना. मग जानव्याने पाठ का खाजवताय.- बायको
ब्रश ने हात लचकला तर? -मी
काही लचकत नाही. वापरुन बघा. घाणेरडी सवय जानव्याची-बायको
त्यात घाणेरडे काय? चेंबुर ला आमच्या चाळीत मे महीन्यात सर्व पुरुष मंडळीचा रात्री ९ वाजता पटांगणात सामुदायिक कार्यक्रम असायचा.
ब्रंहानंदी टाळी लागायची त्यांची. त्यातला आनंद तुला नाय कळायचा.
शी, ..ओ.सी.डी आहे ती- बायको.
लगेच लक्षात आले काय भानगड आहे ते.