ओ.सी.डी.
लेखनप्रकार
ओ.सी.डी. म्हणजे ऑबसेसीव कंपल्सीव डीसऑर्डर. आता ह्याला समांतर मराठी शब्द मला माहीत नाही. पापड,लोणचे, मुरंबा ह्यानी तो द्यावा.
_______________________________________________________
अहो ब्रश आणला आहे ना. मग जानव्याने पाठ का खाजवताय.- बायको
ब्रश ने हात लचकला तर? -मी
काही लचकत नाही. वापरुन बघा. घाणेरडी सवय जानव्याची-बायको
त्यात घाणेरडे काय? चेंबुर ला आमच्या चाळीत मे महीन्यात सर्व पुरुष मंडळीचा रात्री ९ वाजता पटांगणात सामुदायिक कार्यक्रम असायचा.
ब्रंहानंदी टाळी लागायची त्यांची. त्यातला आनंद तुला नाय कळायचा.
शी, ..ओ.सी.डी आहे ती- बायको.
लगेच लक्षात आले काय भानगड आहे ते. बेळगाव वरुन कुंदा आणि सायकॉलॉजी वाल्या मैत्रीणीच्या सायकीऍट्रीक फांदा दोन्हीही घरात आलेले होते.
अग, माझी पाठ, माझे जानवे, ई.एम्.आय नियमित भरत असलेले माझे घर, घराचा बंद दरवाजा, आणि पाठीला सुटलेली खाज ह्यात ओसीडी कुठून आली बॉ?
आणखीन कुठल्या कुठल्या ओसीडी सांगितल्या तुझ्या मैत्रीणीने-मी
कानात बोटे घालुन खाजवणे ही पण ओसीडी- बायको
आयला, बेळगावी आयशीचा सातारी घोव. ही पण ओसीडी? वेळेवर बड मिळाला नाही तर काय करायचे. हात धुतलेले असले आणि नख कापलेले असले तर त्या क्रियेत 'जिवाशिवाची' भेट होते. -मी
तु परत बेळगावला परत कधी जाणार आहेस? मी
कशाला? बायको
परत जाशील तेंव्हा सर्व मैत्रीणींच्या नवर्यांच्या ' कार्यक्षमतेचा तौलनीक अभ्यास' हा विषय पटावर घे. आणि मी सांगतो त्या माझ्या ५ सवयी बद्दल बोल.
कुठल्या?
मी कुठल्या त्या सांगितल्यावर बायको गोरीमोरी झाली.
आणि तुला गॅरंटी देतो, ह्या सवयी सांगितल्यावर तु इथे परत येशील आणि तीथे तीचा नवरा झाडुने मार खाईल. तुझी सायकॉलॉजिस्ट मैत्रीण तिच्या नवर्याला म्हणेल, " . बघा, तुम्हाला ह्या ५ ओसीडी अजिबात नाहीत. माझे फार मोठे नुकसान झाले. जा क्लास लावा"
तुम्ही म्हणजे अशक्य आहात.- बायको.
जाता जाता: समुपदेशक आणि सायकॉलॉजीस्ट मंडळी आपापले पोट भरण्याकरता काय काय खुळ काढतात. त्याच्यावर विश्वास ठेवणारे तेवढेच खुळे. आता त्याला आपण काय करणार? असो.
वरील ओसीडी नियमाप्रमाणे मिपावरच्या ओसीडी कुठल्या हो?
माहीत आहे माहीत आहे १ लंबर माझा - क्रिप्टी़क
चतुरंगः खुद के साथ विडंबन
अवलिया-गुप्तता
धमु- फवारणी
टारझन्-न चा ण
परा- खव अभ्यास
अनंता: टोळ्धाड
लिखाळः टाळ्या वाजवणारा समुदाय
मुक्तसुनितः अगम्य
रामदासः अर्धवट भाग
तात्या: 'मिपा आहे तसे आहे, आवडले तर या नाहीतर गेला बाझवत'
बघा, तुम्हाला आणखी कुठल्या ओसीडी मिळतात ते.
वाचने
4445
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
हॅहॅहॅहॅ..ह
In reply to हॅहॅहॅहॅ..ह by काळा डॉन
+100 % सहमत...
In reply to हॅहॅहॅहॅ..ह by काळा डॉन
+१
In reply to हॅहॅहॅहॅ..ह by काळा डॉन
देव
आपल्या
साबण
In reply to साबण by विनायक प्रभू
खर्च
वाणी
In reply to वाणी by विनायक प्रभू
हा हा
ह्म्म्म्म
प्रत्येक माणसात एक ओ.सी.डी. रुग्ण दडलेला असतो. नाही?
आणखी
खुष खबरी !
In reply to खुष खबरी ! by दशानन
राजा आज
In reply to खुष खबरी ! by दशानन
वा! मस्त !!
In reply to वा! मस्त !! by अवलिया
थोडेसं
In reply to खुष खबरी ! by दशानन
कै
समांतर शब्दः-
In reply to समांतर शब्दः- by मन
हीहीही
In reply to समांतर शब्दः- by मन
"मंत्रचळ" किंवा ओ सी डी म्हणजे
मिपा
In reply to मिपा by घाटावरचे भट
होय. झालाय
In reply to होय. झालाय by नितिन थत्ते
+१
पर्नल नेनेमराठे