हल्ला बोल
लेखनप्रकार
ढेकणाधिपतींनी घसा खाकरला आणि सभा सुरु केली.
________________________________________________________
मिपाच्या २ र्या वर्धापन दिनानिमित्त तात्या अभ्यंकरांनी 'मिपा विश्वसंमेलन 'भरवायचे ठरवले. दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता.
निवासित अनिवासित सर्व सद्स्य संमेलनाला येणार होते. तात्यांनी कौल घेतला. विश्वसंमेलन पुण्याला करायचे ठरवले. सामिष, आमिष व शाकाहारी मेन्यु ठरला. हॉटेल बुकींग क्लार्क शी संभाषण करताना खुर्चीतल्या ढेकणाला ही बातमी कळाली. मंदीमुळे गेले २ वर्षे ह्या हॉटेल मधे 'पेस्ट कंट्रोल' झाले नव्हेते. तात्याना बघताच ढेकुण खुष झाला. येत्या मेजवानीची खबर त्याने सर्व ढेकुण समाजाला पोचवली. ह्या निमित्ताने आपल्या सर्व समाजाचे हिताची काळजी घेणार्या ढेकणाधिपतींनी संभाव्य धोक्याची सुचना देण्यासाठी सभा बोलवली.
_______________________________________________________
" तुम्ही सर्व जण आनंदीत झाला आहात हे मला दिसतच आहे. हे युद्ध आपल्याला जिंकायचे आहे. फारसे नुकसान न होता. हॉटेलचा म्यानिजर रोज मिपाहार करत असतो. त्या निमित्ताने ह्या संस्थळाच्या काही सभासदांचे स्वभाव विशेष मला कळाले आहेत. 'हल्ला बोल" करताना हे गुणावगुण लक्षात घेउनच चढाई करावी. आपापल्या वह्या मधे आता मी जे काही सांगणार आहे त्याची नोंद करा.
अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या.
१. तात्या अभ्यंकरः इथे रक्त पुरवठा भरपुर आहे ह्याने हुरळुन जाउ नका. ज्यांच्या घरात लग्नाची मुले मुली आहेत त्यांनी ह्यांना टाळावे. ह्यांचा लग्न संस्थेवर विश्वास नाही. पौंगडावस्थेत असलेल्यांनी इथे ढुंकुन सुद्धा बघु नये. नंतर मुंबई मधल्या विविध रस्त्यांची ओळख झाली ही तक्रार नको.
२. पिवळा डांबिसः ज्याना आपापल्या आवारात शेती करायची आहे त्यांनी ह्या सद्स्याचा जरुर पाठपुरावा करावा.
३. भडकमकर मास्तरः ज्यांना नाट्यकर्मी, करीयर गाईडन्स व दंतवैद्य असे वेगवेगळे उद्योग एका वेळी करायची ताकद आहे त्यानी ह्यांचा खोलीनंबर लक्षात ठेवावा.
४.प.रा.: आपल्या मुलात भोचक वृत्ती हवी असल्यास ह्या सदस्यांचा विचार करावा. पण 'पिपींग टॉम" होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५. अदिती: ज्यांच्या घरात 'फुल्ली एक्स्प्रेस्ड' ह्या स्वभावाला विरोध आहे त्यांनी ह्यांच्या वाटेला जाउ नये.
६.वि.प्र्.मास्तरः ज्या घरात मुले काय बोलतात हे कळतच नाही ही तक्रार आहे त्यांनी ही खोली टाळावी. ज्यांच्या लग्नाला सुमारे २० वर्षे झाली असतील अशा जोडप्यांनी मुद्दाम भेट द्यावी असे हे सद्स्य आहेत. अर्थात अशा प्रकारचा त्रास असलेल्या कुणालाही मनाई नाही. १० आणि १२ वीत मुले असतील तर त्यांनी जरा जास्त रक्त प्यावे.
७. टारझनः इथे मात्र अनुभवी लोकांनीच विचार करावा. ह्या सद्स्याने कुस जरी बदलली तरी ५० सैनिकांची क्षती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आनि पानी लोनी वाल्यानी काळजी घेउन रक्त प्राशन करावे. 'न' चा 'ण' होण्याची गॅरंटी. वेगवेगळ्या बाईकचा इ.एम्.आय भरायची तयारी करावी लागेल.
८. पर्नल नेने मराठी: शुद्ध लेखनाचे आयुष्यभर बारा वाजले तरी काहीही फरक पडत नाही अशी वृत्ती बाळगणार्यानीच ह्या सद्स्यांचा विचार करावा.
९. विजु भौ: 'बासरी' वादनात रस असलेल्यांनी नक्की भेट द्यावी असे सद्स्य आहेत हे.
१०.मुक्तसुनितः ज्यांना निबंधलेखनात कमी मार्क पडतात त्यांनी ह्या सदस्याना भेट द्यावी. ह्याच खोलीत तुम्हाला ह्याच स्वभाव विशेषाचे सद्स्य लिखाळ सापडतील.
११.अवलिया: ह्यांना चावताना १०० वेळा विचार करा. नाहीतर विचारलेल्या सर्व प्रश्नाना 'पास' म्हणायची सवय लागेल.
१२.राजे: शेअर बाजार मधे करियर करण्याची इच्छा बाळगणार्यानी नक्की धाड मारावी. पण नंतर सुमारे १० दिवस पावले सरळ पडणार नाहीत एवढा अल्कोहोल कंटेंट इथे आहे.
१३.विकासः पोलीटीकल सायन्स चा पुर्ण अभ्यास एकाच प्राशनात हवा असेल तर मात्र संधी सोडु नका. इथे तुम्हाला क्लिंटन जोडीला मिळतील.
१४.विकी,मेथांबा: कम्युनिस्ट विचारसरणीवर विश्वास असलेल्यानी ह्यांचे रक्त जरा जास्त प्यावे. सबकुछ लाल ची खात्री.
१५.अनंता: ह्याना साध्या साध्या वाक्यात गुढ शोधायची सवय आहे.
१६.श्रावण मोडकः ज्यांच्या घरात संपुर्ण चर्चेला मनाई आहे त्यांनी इथे लक्ष देउ नये.
१७.चतुरंगः इथे स्वतःशी बोलणार्यानीच भेट द्यावी.
१८.धमाल मुलगा: ज्यांना लाळेरे परवडेल अशा लोकांनीच इथे भेट द्यावी. ह्यांची मिपा वाचताना फवारे उडवायची सवय आहे.
१९.प्राजु: ह्या सदस्याना चावले की कविता, पाककृती ह्या दोन्ही विषयात पारंगत. महिला ढेकुणांनी जरुर फायदा घ्यावा. पण त्यांच्या पिलाला हात लाउ नका. मग धडगत नाही.
२०.सहज , छोटा डॉन, आनंदयात्री व इतर काही सदस्याबद्दल माहीती अजुन मिळालेली नाही. ह्या लेखातील प्रतिसाद म्यानिजरच्या कॉलर मधे बसुन मी बघणार आहे. ती मिळताच कळवली जाईल.
जय हो.
वाचने
4565
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
कल्पना आवडली
In reply to कल्पना आवडली by सहज
तीर निशाने
In reply to तीर निशाने by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
'पिपींग
In reply to 'पिपींग by घाशीराम कोतवाल १.२
टॉम
च्यायला
>>सिर्फ
मस्त!
पिपुणेकरांचं संमेलन होतं बहुतेक ;) ) विप्र, लेखाची इश्टाईल आवडली.. मस्त! ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)आमंत्रण
विजुभौला
In reply to विजुभौला by विजुभाऊ
लोकसंख्या
काही काही
पास
मला
मला
विप्रकाका
वा!!!
च्यायला ...
भले!!!!
ह्म्म्म!
कायतरी
विश्व संमेलन !