नाती गोती-१
लेखनप्रकार
परत चालेलेल्या लाटेवर पायाखालची वाळु सरकतानाचा अनुभव घेताना अचानक अवलियाने प्रश्न विचारला,
"मास्तर, सर्वात आवडते पुस्तक कोणते?"
"अर्थात महाभारत"- मी
"का"?- अवलिया
मी विचारात पडलो आता उत्तर काय द्यावे.
"नंतर सांगा विचार करुन" अवलिया
कारने घाटकोपर ओलांडल्यावर परत तोच प्रश्न.
"मानवी मनाची आणि नात्यागोत्याची गुंतागुंत इतर कुठेही सापडणार नाही"- मी
"तुम्हाला पटते का बघा, आपण सर्व जण आपल्या आयुष्यात महाभारताचा कुठला ना कुठला अंश जगतोच्-अवलिया
_______________________________________________________
हातातली मिठाईची पेटी बायकोच्या हातात दिली. माझा एक विद्यार्थी संपुर्ण भारतात १० वी त १ ला आला होता त्या निमित्ताने. गेले ३ वर्षे हा नित्यक्रम आहे. आमच्या घरात मिठाईचे कौतुक नाही. ही पेटी आपोआप भावाकडे जाणार होती. आता आदराने आणलेली ही पेटी नाकारायची कशी हे मला कळत नाही. आता पेटीमागची यशाची गाथा चिरंजीवाना सांगणे क्रमप्राप्त होते. ह्या विद्यार्थ्याच्या सायन्स च्या पेपरला त्याच्या आईचे निधन झाले होते. तरी सुद्धा आईला दिलेला शब्द मुलाने संपुर्ण पाळला. कुठल्याही परिस्थितीत आपले ध्येय सोडायचे नाही ह्या वृत्तीचे आणखी एक उदाहरण .
"पेटीवरुन आठवले, हीरोईन भेटायला येणार आहे तुम्हाला"बायको
आता ही हिरॉईन कोण ते मला आठवेना.
अहो असे काय करताय, दोन वर्षापुर्वी ती मोलकरीण भेटायला आलेली आठवते का? राजकपुरला भेटली असती तर 'राम तेरी गंगा 'मधे 'संडासिनी' सोडुन हीलाच घेतली असती असे तुम्ही म्हणाला होतात"-बायको
"हां, हां, आले लक्षात. बोलव उद्या रात्री आठनंतर."
________________________________________________________
दोन वर्षापुर्वीचा प्रसंग आठवला.
"सर पोरीला डॉक्टर करायचे आहे. दहावीला ९०% पाडेल. तुमची फार मदत झाली तीला. आता १२ वीला शीटी परिक्षेत ९५% कसे पाडायचे ते सांगा. डॉक्टर करायचे यश्टीमेट पण सांगा" हीरॉईन
इथे बायको अवाक.
कुठलाही फाफटपसारा न करता एकदम मुद्याचे बोलणे शिकले सवरलेले पालक पण करत नाहीत.
"जात कुठली तुझी" - मी
बामण समजा -हीरॉइन
आता समजा म्हणजे काय ते मला कळेना. कॅटेगरी आहे हे मला कळत होते. आता एन्.टी ३ असेल तर १५०+ मार्क मिळाले तरी सुद्धा ऍडमीशन आरामात मिळणार होती मुंबईमधे. बामणाना १८५+ लागतात. मी माहीती दिली.
"नाही मला जातीच्या कागदावर ऍड्मीशन नको मला, ती तुम्ही सांगाल ते मार्क काढेल. आता खर्च सांगा"-हिरॉइन
शासकीय कॉलेज मधे मिळाली तर साधारण दोन ते तीन लाख डीग्री मिळे पर्यंत. प्रायवेट कॉलेजमधे साधारण २० लाख.- मी
"ठीक आहे" हिरॉईन
आता हैराण व्हायची पाळी माझी होती.
"कुठून आणणार आहेस तु २० लाख प्रायवेट कॉलेजकरता"
"सागेन तीच्या 'बा' ला. तु काय पण कर पण पोरगी डॉक्टर झाली पायजे. दरोडा घाल, मर्डर कर, मला माहीत नाय. तीला काहीही कमी पडल नाय पायजे".-हिरॉइन
तु एक काम कर तु तुझ्या मुलीला घेउन ये. मी तीला नीट अभ्यासाचे कसे करायचे ते सांगतो- मी
"उद्याच आणते सर" हिरॉईन
नंतर ती काही आली नाही. मी पण विसरुन गेलो. आता दोन वर्षानंतर काय विचारणार होती कुणास ठाउक.
वाचने
4184
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
पुढचा भाग
कुणासाठी,
पुढे
लवकर
चेहरा
मास्तुरे, य
पुढचा भाग
पुढे हो?
क्रीप्टीक
In reply to क्रीप्टीक by ब्रिटिश
बघा
छान, पुढील
गुर्जी
छान .. पुढे
गुर्जी
+१
गुर्जी ...