कधी कधी मे च्या प्रचंड उन्हामध्ये देखील पावसाचा हलकासा वर्षाव देखील मन हेलावून जातो असेच काहीतरी त्याच्या सोबत घडले होते, अस्ताव्यस्त राहाणारा, मित्राच्यात दंगा घालणारा, तासंन तास फोनवर बोलणारा तो अचानक दोन दिवसामध्ये बदला, गप्पा मारणे नाही, चुकून देखील फोन करणे नाही जेव्हा आम्ही फोन करु तेव्हा त्याचा फोन बिझी दिवस असो वा रात्र... व हाच बदल जवळ जवळ महिनाभर सर्वजण पाहत होते, काय झाले काय नाही ह्यावर चर्चा करत होते मित्राच्या गप्पामध्ये हॉट टॉपिक बनला होता व अचानक एक दिवस त्याचा फोन आला...
तो - अबे अडचण आहे मदत करशील का ?
मी- बोल लेका जवळ जवळ दिड महिन्याने तु माझी आठवण काढली आहेस...