दलाल
लेखनप्रकार
"काय मास्तर काय चाललय"? सकाळीच रामदासांचा फोन आला.
"का, बाबा आम्हा गरीबांची आठवण काढली" मी
"पैसे कमवायची असलेली अक्कल न वापरता गरीब राहायची हौस असलेल्यांना काय करायचे" रामदास
" काय कळले नाय बॉ" मी
त्याना काल एक कुठल्याशा शिक्षण संस्थेचे एक पत्र आले होते. १२ वी नंतर मेडिकल, इंजीनयरींग, फार्मसी मधे अॅडमिशन मिळवुन देण्यात मदत करतो अशा संदर्भाचे. तसेच त्यानी एक डॉक्टर युगुल मेडीकल अॅडमिशन बद्दल मार्गदर्शन करते ह्या बाबत एका वर्तमान पत्रात लेख वाचला होता. त्यांचे म्हणणे असे होते की मला सर्व माहीती असुन मी ह्या क्षेत्रात का कार्यरत होत नाही.
जुन महीना आला रे आला की असे मार्गदर्शन करणार्या संस्थांच्या जाहीराती पेपरात दिसायला लागतात. बहुदा सर्वजण खाजगी मेडीकल कॉलेज व इंजीनयरींग कॉलेज चे दलाल असतात. मी पालक म्हणुन हे सर्व फार जवळुन अनुभवले आहे. अगदी चीरंजीव मेरीट मधे आले असुन सुद्धा. निव्वळ माहीती करता. अर्थात ह्या बाबतीत सर्व जणाना थोडीफार ऐकीव माहीती असतेच. पुर्ण नसते. ह्या लेखातील माहीती वाचकांनी आपल्या निकटवर्तियांना देउन जागृत करावे ही इच्छा.
मेडीकलः महाराष्ट्रात सुमारे २ हजार जागा शासकीय रुग्णालयात एम्.बी. बी.एस. करता भरल्या जातात. सी.ई.टी चा कट ऑफ पॉइंट १८०/२००. कधी कधी एखाद दुसरा मार्क मागे पुढे. इथे फक्त मार्कांची मेरीट. जे काही आरक्षण आहे ते सुद्धा मेरीट च्या क्रमाने.
डेंटीस्ट च्या जागा अशाच भरल्या जातात. साधारण कटऑफ वरील प्रमाणे.
नंतर येते ते प्रायवेट मेडीकल कॉलेज. ह्यांची पण स्वःत ची सी.ई.टी असते. वर्षाची फी दोन ते चार लाख. त्यांच्या ग्रेड प्रमाणे. ही ग्रेड कशी मॅनिप्युलेट केली जाते हा विषय इथे नाही. ह्या सर्व कॉलेजना एक ठरावीक सीट्स डोनेशन घेउन विकायचा सरकारी परवाना असतो.
मॅनेजमेंट कोटा. एन्.आर्.आय कोटा वगैरे वगैरे. ह्या कोट्याच्याच्या सोट्याची किंमत एम.बी. बी.एस्.ला सुमारे ३० लाख. डेंटीस्ट ला सुमारे २५ लाख. फिजिओथेरपी ला ५ लाख. परत ग्रेड प्रमाणे २ ते ५ लाख अधीक उणे. ह्या सर्व कॉलेजचा एक जनक शिक्षण सम्राट असतो. तो किंवा त्याचे चिरंजीव १ जुन नंतर ऑफिस मधुन हलत नाहीत. वर उल्लेख केलेल्या दलालानी पाठवलेल्या पालकांबरोबर चर्चा आणि निर्णय अतीम फी चा हा एकच उद्योग असतो. जर पालकांना आपल्या मुलाची गुणवत्ता न बघता अॅडमिशन हवी असते त्यांनी सरळ ह्यांना भेटण्याची व्यवस्था असते. कुठल्याही दलालाची गरज नाही. बाहेर बसलेल्या रांगेने गडबडुन जायचे नाही ही मानसिकता हवी. ही किती खरी किती खोटी हे कळायला फारशी अक्कल लागत नाही. ह्या रांगेत 'पेड ब्रेन वॉशर्स' असतात. तुमची असुरक्षितता जेवढी जास्त तेवढे पैसे जास्त. मी केवळ माहीती करता सुरवातीचे इलेक्ट्रॉनिक्सचे २.५ लाख चे कोटेशन बारगेनींग करुन १ लाख पर्यंत आणले होते. हे सगळ्यांना शक्य होत नाही.
आणि ह्या असुरक्षिततेचा दलाल फायदा घेतात. कॉलेजला दलाल काय कमावतात ह्याच्याशी काहीही देणे घेणे नसते. त्यांचे टारगेट पुर्ण करणे ह्या व्यतिरिक्त त्यांना इतर कशातही रस नसतो. तुम्हाला भेटणारा हा 'माइंड गेम' एक्स्पर्ट असतो.
इंजीनियरिंगः महाराष्ट्रात सुमारे ५०००० हजार असताना सुद्धा पालक इंजीनीयारींग ला सुद्धा डोनेशन भरतात. अमुक एक कॉलेज अमुक एक शाखा मार्क मिळाले नसले तरी हवी ह्या हट्टाने हे पैसे मोजावे लागतात. कॉलेजच्या ग्रेड प्रमाणे हा सोटा सुमारे एक लाख ते १२ लाखाचा असतो. काही मंडळी कारण नसताना कॅप प्रोसेस ला घाबरुन हे पैसे मोजतात. सुमारे ५५% मार्क मीळाले तरी महाराष्ट्रात कुठे ना कुठे तरी अॅडमिशन मिळतेच. जरा धीर धरावा लागतो. मागच्या वर्षीचे प्रत्येक कॉलेज चे कट ऑफ dte.org.in वर मिळतात. आपले मार्क बघुन फॉर्म भरायला ह्या साईटचा उपयोग होतो. आता ५५ % मार्क मिळालेल्या मुलाला इंजीनीयरींग जमेल का नाही हा प्रश्न विचारायचा नाही. हा ज्याच्या त्याच्या हौसेचा आणि इच्छेचा प्रश्न. डीग्री विकत घ्यायची ताकद आहे ना? बास.
एक फार मोठ्या शिक्षण सम्राटांच्या शाळेत माझा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमानंतर सम्राटांनी मी न विचारता एक माहीती दिली.
"सर , फार चांगले कार्य करत आहात. ह्याचे काय मानधन आहे ते सांगा. मी देतो. पण ह्या कार्यक्रमाच्या जोरावर कुणा विद्यार्थ्याला डोनेशन कमी करा अशी विनंती घेउन येउ नका. ते मी करणार नाही".
जाता जाता: अहो, रामदास, पेपरमधे जाहीरात येते. "सुमारे १५० मेल ,फीमेल हवी आहेत. मजा पण पैसा पण." करु का अॅप्लाय?. फीट आहे.
जास्त पैसा मिळेल.
वाचने
4742
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
छान
In reply to छान by आनंदयात्री
प्रयोजन
In reply to प्रयोजन by विनायक प्रभू
पेपरमधे
In reply to पेपरमधे by टारझन
हो!!!
In reply to हो!!! by बिपिन कार्यकर्ते
एकदम
चांगली माहीती
हा हा हा
छान समुपदेशन.
बापरे
खूप छान
खूप छान
गुर्जी
विप्र
In reply to विप्र by मराठमोळा
शिक्षणाचा
वा! मस्त !!
वसुमारे
हे आकडे वाचले की
In reply to हे आकडे वाचले की by संदीप चित्रे
संदीपशी
खूपच
मास्तर !
.
.
.
.