Skip to main content

चारोळ्या

किरण

लेखक मयुरपिंपळे यांनी बुधवार, 06/02/2013 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक क्षितीजा ची किरण येते रंगात रंग देऊन जाते! सावलीला ही किरणाची सवय लागते अंधार मधे जाऊन विसावा ती घेते! -- मयुर

मनमुक्त

लेखक समयांत यांनी मंगळवार, 22/01/2013 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
परिधान केलेला घनक्लांत तो, मनमुक्त बोल उधळत आहे.. जीवाच्या काहिलीने मी शोधत राहतो त्याच्या घनविभोर परिश्रांतीसाठी युगुल युक्त नजारा.... पण दाटून येतो निव्वळ विरहनियुक्त किनारा.. ;) त्याच्या भेटीच्या असोशीने..... n
काव्यरस

दीप

लेखक समयांत यांनी शुक्रवार, 21/12/2012 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...
काव्यरस

कविता

लेखक सु.द.मोरे यांनी शुक्रवार, 21/12/2012 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
तु मला नेहमी विचारायचीस ना की कश्या रे जमतात तुला कविता ..? मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ... सु.द.मोरे

कविता

लेखक सु.द.मोरे यांनी बुधवार, 19/12/2012 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी केलेली प्रत्येक कविता तुला ऐकवावीशी वाटते..! पण खर सांगु, तु मनापासून ऐकतेस ना म्हणून तर कविता करावीशी वाटते..!!

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

चारोळी: पाऊस प्रणय रात्र!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 01/12/2012 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
~~~~ धुंद संथ पाऊस धारा... ~~~~ मंद थंड भावुक वारा! ~~~~ अधीर मन उत्सुक गात्र... ~~~~ अनंत क्षण प्रणय रात्र!
काव्यरस

चारोळ्या-(स्वरचित)

लेखक रसायन यांनी शनिवार, 01/12/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी काही लिहावं.. पण शब्दचं सुचत नाही शब्दांनाही बहुधा आपल्यातीलं दुरावा रुचत नाही. नि:शब्द माझ्या भावनांना शब्द तुझेच हवेत ह्या शब्दांनाही फुलायला श्वास तुझेच हवेत एका गोष्टीचं मला नेहमीचं नवलं वाटतं टाळायचं म्हटलं तरीही मनं तुझ्याचं विचारांत रमतं तु नसतानाही तुझं अस्तित्वं अगदिच वेडावून टाकतं शब्द बनुन ते, ह्या चारोळ्यातं अवतरतं

मा़झ्या चारोळ्या

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!
काव्यरस

चारोळी

लेखक कल्पी जोशी यांनी शुक्रवार, 09/11/2012 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
तूझं मला आठवणं माझं देहभर उजळण कुणाची नजर न लागो काळोखात पणतीचं लकाकण कल्पी