आमच्या घरामागे कोणे एके काळी एक 'भुदरगड' नावाची पतसंस्था होती...
आमच्या शहरातील काही बडी प्रस्थं आणि मान्यवर त्या 'पतसंस्था' नावाच्या 'दुकानाशी' बांधून होते.
त्या सगळ्यांच्या 'पुण्याई'मुळे बरेच छोटे छोटे गरजू गुंतवणूकदार गोळा झाले.
आणि पतसंस्थेला प्रचंड बरकत आली.
मग काय धडाधड कर्ज वाटप सुरु झाले..सगळीकडे कसा आणंदी आणंद झाला.
पण एके दिवशी एकाएकी बातमी आली की पतसंस्था बुडाली.
मग काय ..लोकांचे थवेच्या थवे ,झुंडीच्या झुंडी,जथ्थेच्या जथ्थे 'दुकानासमोर' आल्या..
पुरुषांच्या शिव्या,, बायकांचे करवादणे,,याचा एकच हलकल्लॉळ झाला..
आमच्या ओळखीतले किमान १००-१५० जण असे होते की त्यांचे सुमारे रु.१०,००० - २,०