Skip to main content

विरंगुळा

तपकिरी डोळे

लेखक म्हया बिलंदर यांनी मंगळवार, 03/03/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"काय रे? काय करतोस ईथे?" एका रांगड्या आवाजाने विचारले. मी हबकलो, घाबरलो. काहीतरी बोलायचं म्हणून, "म्म..म..मी.." "अरे तू इथे कसा? काही शोधतोयस का? बाबा हा माझ्याच वर्गातला आहे." रांगडा आवाज "हूं " म्हणून नाहीसा झाला. हलके कुरळे केस सावरीत तिने पुन्हा विचारले, "काही शोधत होतास का?" माझ्या तोंडून चटकन निघालं "तूलाच" ती थोडी आश्चर्याने "काय?" "अं.. तूलाच सपना तायडेने ईंग्लीशच्या नोट्स दिल्यात ना! त्या हव्या होत्या" मी कसा बसा हे सगळं बोललो असेन. ती "हो दिल्यात. हव्या आहेत का?" मि "हो." ती "ये ना. ईथेच घर आहे." मि एक पाऊल टाकून दचकलो आणि "न्न.. नको." म्हणालो.

दुलई.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दोशी फाऊंडेशनच्या नाट्यमहोत्सवाला जाण्याचा योग आला. त्यात शेवटच्या दिवशी नासिरुद्दीन शाह, रत्ना शाह व हिबा शहा यांनी सादर केलेल्या इस्मत चुगताईंच्या कथाकथनाचा कायम लक्षात राहील असा कार्यक्रम झाला. या तिघांनी त्या कथा त्यांच्या अभिनयाची जोड देऊन इतक्या बहारदारपणे सादर केल्या की बस ! अर्थात नासिरुद्दीन शाहच्या दिग्दर्शनाचा त्यात मोठा वाटा होता हे नाकारण्यात अर्थ नाही. पण सगळ्यात मोठा वाटा होता त्या कथांचाच. आता खाली मी इस्मतआपाची एक कथा मराठीत अनुवाद करणार आहे ती त्यांनी १९४२ साली लिहिली. बाई मोठ्या हिंमतवान, समाजावर ढोंगीपणासाठी हलक्या फुलक्या विनोदाने टीकेचे आसूड ओढत.

विज्ञान कथा: "शापित श्वास!"

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 03/03/2015 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीवरचा निसर्ग-बिंदू वेगाने आकाशात चालला होता. तो काळोख्या अनंत आकाशात एका अज्ञात ठिकाणी खूप दूरवर पोहोचल्यावर त्यापासून पाच बिंदू वेगळे झाले- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश! ही पंचमहाभूते एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र आले होते. ते पाचही बिंदू तरंगत होते. अग्नी ने हसतच बोलायला सुरुवात केली, म्हणाला, "कमाल आहे माणसांची! पृथ्वी च्या अंताबद्दल त्यांनी चित्रपट बनवून देखील टाकला. २०१२. पण ते वर्ष उलटून गेले आणि त्याप्रमाणे झालेच नाही. बिचारी माणसे, त्यांना वाटत आहे की विज्ञानामुळे आपण निसर्गावर सुद्धा मात केली आणि निसर्ग आपला अंत कसा करेल हे सुद्धा आपण ठरवू.

विज्ञान कथा: "अपूर्ण स्वप्न"

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 02/03/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
शंभू शेवाळे हा माझा परम मित्र. पुण्यात असतो. मी मुंबईला बँकेत नोकरीला लागलो आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून आपला संसार सांभाळायला लागलो. माझी पत्नी घर सांभाळते आणि मला आठ महिन्यांचा मुलगा आहे. शंभू लहानपणापासून संशोधक वृत्तीचा. त्या वृत्तीमुळेच तो आज मोबाईल अॅप्लीकेशन बनवणार्‍या एका कंपनी चा मालक बनला आहे. अजूनही तो स्वतः अनेक अॅप बनवत असतो. मला लहानपणापासून अंतराळवीर बनण्याचे स्वप्न होते. आकाशातल्या ग्रहतार्‍यांचे खूप आकर्षण वाटे. अर्थात परिस्थिती मुळे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 01/03/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मी रिक्षाच्या मागच्या खिडकितून..कवाडीच्या दारातून आमच्या रिक्षाकडे पहात असलेल्या काकूचं स्तब्ध मनानी दर्शन घेत राहिलो...रिक्षा पुढे निघाली..पण घर येइस्तोवर,माझी मान खाली होती..आणि डोळे ओलेचिंब. पुढे चालू... ========================== घरी येऊन दोन दिवस झाले,तरीहि माझ्या मनावरून पाठशाळेच्या आठवणी काहि केल्या सरत नव्हत्या. गोठ्यात गेलो,तर आमच्या गायीच्या ऐवजी तिथली तांबू आठवायची.

दिन्याचा राजा

लेखक म्हया बिलंदर यांनी शुक्रवार, 27/02/2015 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिन्याच्या राजाला काळी प्यांट इन केलेला शर्ट घालून एका उंच स्टुलावर चढून आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घराच्या पत्र्यावरून काढताना पाहून मजा वाटली. दुसरा कोणी असता तर लक्ष्य गेलं नसतं पण हा दिन्याचा राजा होता दिन्याचा राजा. हा तसा माझ्या हून वयाने लहान. आम्ही घर बदलून ह्या वस्तीत येऊन नुकतेच राहू लागलो होतो. नवे मित्र बनवत होतो. आमच्या क्रिकेट खेळायची जागा म्हणजे दारा समोरून जाणारी वाट. तिच्या शेवटी भंगारचा धंदा करणार्‍या खान अंकलचं घर आडवं गेलेलं. त्याच्या भिंतीला लागला की सिक्स. सगळी घरं बैठी.

म्हण (शतशब्द्कथा)

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 27/02/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?'' नाही बेटा . ''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?'' बघू . ती म्हण आहे, म्हण . ''काय म्हणू?''' अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात. लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं . ''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?'' तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो. *** जयाकाकू आलेल्या. सारखं बोलतच रहातात .